SHIVSENA SAKAL
महाराष्ट्र बातम्या

Andheri By-Election: पोटनिवडणूक जाहीर पण चिन्हाचं काय? CM शिंदेंसमोर नवा पेच

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ६ राज्यातील ७ जागासाठी पोटनिवडणुका पार पडणार असून ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी राज्यात शिवेसेनेच्या पक्षचिन्ह आणि नावावरून शिंदे गटासमोर संभ्रम निर्माण झाला आहे.

(Andheri By-Election Latest Updates)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील ही पहिली निवडणूक आहे. त्यामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता अंधेरी पूर्व मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले असून शिवसैनिकांकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गट आणि ठाकरे गटासमोर पक्षचिन्हावरून पेच निर्माण झालाय.

शिवसेना कुणाची आणि पक्षचिन्ह कुणाचं हा वाद निवडणूक आयोगाकडे असताना आता या निवडणुकांत शिंदे गटाला आणि ठाकरे गटाला उमेदवार देता येईल का? दिले तर चिन्ह आणि पक्षाचं काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे. तर हा वादसुद्धा निवडणूक आयोगाकडे जाणार असून आयोग यासाठी काय निर्णय देणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर या निवडणुकांत शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील ६ राज्यातील ७ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. बिहार, महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, उत्तरप्रदेश, ओडिसा या राज्यातील विधानसभेच्या सात जागावर निवडणुका पार पडतील. यासाठी ७ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान अर्ज करता येणार असून ३ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

SCROLL FOR NEXT