Pune Chandni Chowk Bridge esakal
महाराष्ट्र बातम्या

Chandni Chowk Bridge Demolished : पूल पडल्यानंतर चांदणी चौकातून 11 तासांनी वाहतूक सुरू

अवघ्या पाच सेकंदात हा पूल जमीनदोस्त झाला.

सकाळ डिजिटल टीम

Pune Chandni Chowk Bridge : मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पडण्यात आला. अवघ्या पाच सेकंदात हा पूल जमीनदोस्त झाला. 600 किलो स्फोटकांच्या माध्यमातून हा पूल पाडण्यात आला. आता उर्वरित पाडकाम पोकलेनच्या सहाय्यानं पडण्याचं काम सुरू झालं आहे. रात्री दहापासूनच चांदणी चौकाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. पूल रविवारी पहाटे एकच्या सुमारास पाडण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूल पडल्यानंतर चांदणी चौकातून 11 तासांनी वाहतूक सुरू

पुणे : मागील अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी होत असलेल्या चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर रविवारी सकाळी 10 वाजता वाहतूक खुली करण्यात आली. 11 तासांनी चांदणी चौकातून वाहतूक पुढं मार्गस्थ झाली. चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांदणी चौकातील एनडीए रस्ता - बावधन पूल पाडण्याचं नियोजन करण्यात आलं होतं. 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री एक वाजता पूल पाडण्यात आला. दरम्यान, रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी पुलाचा राडारोडा काढण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र, राडारोडा कठीण असल्याने रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तो काढणे अद्याप शक्य झाले नव्हते. त्यामुळं प्रशासनाने रविवारी सकाळी 8 वाजता महामार्गावरील वाहतूक सुरू करण्याचे दिलेले आश्वासन अपूर्ण झाले नव्हते. त्यामुळे अवजड वाहतूकीसह हलक्या वाहनाही मोठा वळसा घालून जावा लागत होता. मात्र, आता वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.

चांदणी चौक : काही वेळातच वाहतूक सुरू होणार

पुण्यातील चांदणी चौक परिसरातील रस्त्याची एक बाजू पूर्णपणे साफ झाली असून काही वेळातच वाहतूक सुरू होणार आहे.

पुढच्या 20 मिनिटांत सगळा ढिगारा साफ होईल : जिल्हाधिकारी देशमुख

पूल पाडल्यानंतर ढिगारा उचलण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून, पुढच्या 20 मिनिटांत सगळा ढिगारा साफ होईल, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. यामुळं लवकरात-लवकर हा मार्ग सुरू होईल, असंही देशमुख यांनी सांगितलं.

• पर्यायी मार्ग असा

1) मुंबईकडून सातारा, कोल्हापूर इथं जाण्यासाठी

संबंधित वाहनांनी उर्से टोल नाका येथून जुना मुंबई-पुणे महामार्ग किंवा रावेत, वाकड, बाणेर, औंध, शिवाजीनगर, डेक्कन, टिळक रस्ता, स्वारगेट मार्गे पुढे जाता येणार आहे.

2) सातारा, कोल्हापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज, स्वारगेट, टिळक रस्ता येथून किंवा धायरी, सिंहगड रस्ता, नळ स्टॉप, विधी महाविद्यालय रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून औंध, वाकड मार्गे पुढे जावे लागणार आहे.

चांदणी चौक : पूल पाडल्यानंतर निर्माण झालंय धुळीचं साम्राज्य

चांदणी चौकातला पूल पाडल्यानंतर धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे. रात्री अडीच वाजता हा पूल पाडला गेला आणि इथं मोठी धूळ पसरली आहे. आजूबाजूच्या परिसरात खिडक्या, गाड्या किंवा इतर वस्तू धुळीनं माखल्या आहेत. सकाळी आठ वाजता वाहतूक सुरू होईल, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. पूल पाडल्यानंतर इथला ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

चांदणी चौकातील पाडलेल्या पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम सुरु

पूल पाडल्यानंतर गेल्या सहा तासांहून अधिक काळ तिथला राडारोडा हटवण्याचं काम अद्यापही सुरूच आहे. जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीनं दोन्ही बाजूंनी काम सुरु आहे. स्वतः जिल्हाधिकारी रात्रीपासून या कामावर लक्ष ठेवून आहेत. चांदणी चौकातली वाहतूक अजूनही बंदच आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. ढिगारा हटवण्याचं काम काही तास सुरुच राहणार आहे. तोपर्यंत या ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात आला आहे.

पूल पाडण्यासाठी कंट्रोल ब्लास्टचा वापर

चांदणी चौकातील हा पूल पाडण्यासाठी कंट्रोल्ड ब्लास्ट पद्धतीचा वापर करण्यात आला. हा ब्लास्ट करताना लोखंडी जाळीच्या आठ लेअर लावण्यात आलेल्या होत्या. यावेळी जिओ पद्धतीच्या पांढऱ्या कापडाचा धूळ न उडण्यासाठी वापर करण्यात आला होता. पूल पडल्यानंतर दहा मिनिटातच जेसीबीच्या सहायानं राडाराडा बाजूला करण्याचं काम सुरू झालं होतं. या ब्लास्ट दरम्यान संपूर्ण पूल मात्र जमीनदोस्त झाला नाही. उर्वरित स्ट्रक्चर जेसीबीच्या सहाय्यानं पाडण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांचं रात्रभर 'जागरण'

पुणे : रविवारी मध्यरात्री एक वाजता चांदणी चौकात पूल पाडण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थिती होते. स्फोट झाला, पूल पडला, राडारोडा काढण्याचं कामही सुरू झालं. पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी पुन्हा डॉ. देशमुख चांदणी चौकात काम पाहण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत हजर झाले. एकीकडं, हजारो हात रस्ता मोकळा करण्यासाठी संपूर्ण रात्र मेहनत घेत असतानाच, दुसरीकडं दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी देखील रात्रभर "फील्ड"वर हजर होते, "सर अजून घरी गेले नाहीत का ? " या प्रश्नावर देशमुख यांचं उत्तर होतं, "काम झालं की जाऊच की"!

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT