Bollywood sakal
महाराष्ट्र बातम्या

Bollywood Railway : बॉलीवूडचे पश्चिम रेल्वेशी प्रेमळ नाते, एक वर्षात कमावले कोट्यावधी रुपये

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेवर विविध ठिकाणी २० हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेवर विविध ठिकाणी २० हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे.

मुंबई - पश्चिम रेल्वेची रेल्वे स्थानके नेहमीच चित्रपट निर्मात्यांना प्रिय असतात. २०२२-२३ या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेवर विविध ठिकाणी २० हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले असून त्यामधून १.६४ कोटींचे उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळाले आहे. एका अर्थाने चित्रपटसृष्टीचे पश्चिम रेल्वेशी असे प्रेमळ नाते जुळले आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेवर विविध ठिकाणी २० हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. त्यामधून १.६४ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पश्चिम रेल्वेने ६७ लाख रुपये कमावले; तर २०१९-२० मध्ये ते एक कोटी आणि २०१८-१९ मध्ये ते १.३१ कोटी कमावले होते.

गेल्या काही वर्षांत पश्चिम रेल्वे परिसरात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे शूटिंग करण्यात आले आहे. यामध्ये लंच बॉक्स, हिरोपंती २, गब्बर इज बॅक, एअरलिफ्ट, पॅडमॅन, रा. वन, फँटम, एक व्हिलन रिटर्न्स, ये जवानी ही दिवानी, राधे, लक्ष्मी बॉम्ब यांचा समावेश आहे. काई पोचे, आत्मा, घायाळ रिटर्न, कमिने, हिरोपंती, हॉलीडे, थुपाकी (तमिळ चित्रपट), डी-डे, शेरशाह, बेल बॉटम, ओमाय गॉड २ यासह गुजराती चित्रपट कच्छ एक्स्प्रेस आणि लोचा लपसी, मराठी चित्रपट आपडी थापडी यांचाही यात समावेश आहे; तर एक्स-रे, अभय २, ब्रेथ इन द शॅडोज, डोंगरी ते दुबई इत्यादी वेबसीरीज आणि केबीसी प्रोमोदेखील पश्चिम रेल्वेच्या लोकेशन्सवर शूट करण्यात आले. यातून रेल्वेने ही मोठी कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjaykaka Patil Sangli : संजयकाका पाटील पुन्हा भाजपवासीय होणार, चंद्रकांत दादा सुनेत्रा पवारांचे नाव घेत म्हणाले, तासगावचे राजकारण पुन्हा बदलणार

IPL 2026: 'तूझे सिक्रेट्स अन् आतल्या गोष्टी माहितीयेत, त्यामुळे ...' वैभव सूर्यवंशीसोबतच्या चर्चांवर ईशान किशानचा खुलासा

काहींचा आग्रह, तर कुणाला हवी मुदत! मराठीच्या मुद्द्यावरून रिक्षा संघटनांत गट

Latest Marathi News Live Update: स्कार्पिओचा टायर फुटून समृद्धी महामार्गावर अपघात; पाच जण जखमी

iPhone Fold या iPhone Ultra! कोणत्या नावाने लॉन्च होणार Apple चा पहिला फोल्डेबल फोन? किंमत किती असणार पाहा

SCROLL FOR NEXT