Raosaheb Danve sakal News
महाराष्ट्र बातम्या

Bullet Train: समृद्धी महामार्गानेच येणार बुलेट ट्रेन-रावसाहेब दानवे

अर्थसंकल्पात पुढील २५ वर्षांचा वेध घेण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मुंबई (Mumbai) बुलेट ट्रेनचे (Bullet Train)नियोजन जवळपास पूर्ण झालेले आहे. समृद्धी महामार्गानेच ही ट्रेन येणार आहे. त्यासाठी आता केवळ ३० टक्के जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. उर्वरीत जमीन समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वेळी घेतलेलीच कामी येणार आहे. त्यामुळे त्याच मार्गाने आता बुलेट ट्रेन येणार आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी नागपूरात (Nagpur) माहिती दिली.

दानवे पुढे म्हणाले, केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुढील २५ वर्षांचा वेध घेण्यात आला आहे. सर्वच क्षेत्रांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. या महिन्याच्या अखेरीस किंवा फारच फार मार्च महिन्यामध्ये मुंबई बुलेट ट्रेनचा विकास आराखडा तयार होणार आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते तर गरीबांना पक्क्या छताची घरे मिळाली नसती. जागतिक पातळीवर मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. विरोधक अर्थसंकल्प न वाचताच प्रतिक्रिय देण्यासाठी तुटून पडले आहेत. विरोधकांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

विरोधक अर्थसंकल्प न वाचताच प्रतिक्रिय देण्यासाठी तुटून पडले आहेत. विरोधकांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

बुलेट ट्रेनवरून नाना पटोले यांनी भाजपवर याआधी हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते,बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबईला लुटून नेण्याचा डाव भाजपने आखला आहे. भाजपमुळे पंचायत समिती निवडणूक नव्याने लादली गेल्याची टीका महाराष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी तिल्हेर सभेत केली होती. तर बुलेट ट्रेन नाशिकमधून का नाही, असा प्रश्‍न अभियंता राजेंद्र जाधव यांनी उपस्थित केला होता.

कॉंग्रेसने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलने करण्याचा सपाटा लावलाय. कारण त्यांचे महाराष्ट्रातील अस्तित्व संपल्यात जमा आहे. आम्ही जिवंत आहोत, हे दाखवण्याच्या कॉंग्रेस नेत्यांचा हा केवीलवाणा प्रयत्न आहे, असे म्हणत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कॉंग्रेसच्या आंदोलनांचा खरपूस समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT