mobile thief esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Crime : शतपावली पडतेय भारी; मुंबईत मोबाईल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; पोलिसांचे दुर्लक्ष?

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Crime: घाटकोपरमध्ये सध्या मोबाईलचोरीचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी शतपावली करत मोबाईलवर बोलणेदेखील आता भारी पडू लागले आहे. बोलत असताना हातातील मोबाईल हिसकावून चोरी करण्याचे प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढले आहे.

तर बसमध्ये प्रवाशांच्या खिशातील मोबाईलवर डल्‍ला मारणारी टोळीच सक्रिय झाली आहे. नुकतीच घाटकोपर पोलिसांनी दाने मोबाईल चोरांना रंगेहाथ अटक केली आहे; मात्र पोलिसांनी आणखी चोख सुरक्षा व्‍यवस्‍था करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

मागील दहा दिवसांत घाटकोपरमध्ये मोबाईल चोरीच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत. यामध्ये ५ ऑक्‍टोबर रोजी फिर्यादी हे मधुबन टोयोटा शोरूमसमोरून एल. बी. एस. मार्ग येथून मोबाईलवर बोलत पायी चालत जात असताना बजाज पल्‍सरवरून आलेल्‍या दोघांनी त्‍यांच्‍या हातातील ३० हजार रुपयांचा आयफोन चोरून पळ काढला.

याबाबत घाटकोपर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी मिळालेल्‍या गोपनीय माहितीच्या आधारे मोसीन लयीत अन्सारी (२० वर्षे) याला अटक केली. त्याच्‍याकडे चौकशी केली असता त्‍याने साथीदाराच्‍या सहाय्याने मोबाईल चोरी केल्‍याची कबुली दिली.

तर दुसऱ्या घटनेत ६ ऑक्टोबर रोजी घाटकोपर पश्चिम येथून बसमधून प्रवास करत असताना फिर्यादीच्‍या खिशातील नवीन मोबाईल लंपास करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.

त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बसमध्ये मोबाईल चोरी करणारा मोहम्मद आरिफ अकबर हुसेन याला अटक करून त्याच्याकडून चोरलेले आणखी काही मोबाईल फोन हस्‍तगत केले. तसेच आरोपीकडून मोबाईल विकत घेणारा जमीर समीर सय्यद यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यात चोरीस गेलेले मोबाईल तसेच इतर गुन्ह्यांतील विविध कंपन्यांचे तब्बल १ लाख ४१ हजार रुपये किमतीचे इतर मोबाईलदेखील हस्‍तगत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT