Mumbai Rain Updates  esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Rain Updates : पावसाने मुंबईची तुंबई केली! 'या' भागांमध्ये साचलं पाणी, प्रवाशांना फटका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबईत गुरुवारी बरसलेल्या पावसामुळे शहराच्या ट्राफीक कोंडीची परिस्थिती होती. पश्चिम उपनगरासह चेंबूर,कुर्ला, विक्रोळी, हिंदमाता, चुनाभट्टी, सायन आणि किंग्ज सर्कल परिसरात ट्राफीक धीम्या गतीने सुरु होते. मुंबई आणि उपनगरातील अनेक रस्त्यांवर काही प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते, त्यात जागोजागी निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतूकीला फटका बसला.

गुरुवारी दिलेल्या रेड अलर्टच्या इशाऱ्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी अनेक मार्गावरची वाहतूक बंद केली. पर्यायी मार्गावर वाहतूक वळवली.सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहतूक कोंडी तसेच वाहतूकीसाठी बंद करण्यात मार्ग, पर्यायी मार्गाची माहिती देण्यात आली. महत्त्वाच्या कारणाशिवाय वाहने काढू नका असे आवाहन ट्राफीक पोलिसांकडून करण्यात आले होते. शाळा, कॉलेजचा सुट्टी दिल्यामुळे वाहनांची गर्दी इतर दिवसाच्या तूलनेत कमी होती.

पश्चिम द्रूतगती मार्गावर कोंडी

वांद्रे येथे पाणी साचल्याने पश्चिम द्रूदगती मार्गावर वाहनांची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. या मार्गावर जागोजागी वांद्रे ते सांताक्रुझपर्यंत ट्राफीक कोंडीची परिस्थिती होती. अंधेरी ते गोरेगाव पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले होते. परिणामी कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या.

संथ गतीने वाहतूक

मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी बेस्ट बसची वाहतूक वळवण्यात आली होती. दहिसर पूर्व परिसरात बेस्ट बसेसची वाहतूक वळवली होती. सायन रोड येथे पाणी भरल्याने सायन सर्कल ते सायन स्टेशन सिग्नल दरम्यान वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाजवळ तर हिंदमाता परळधील दक्षिण मुंबईकडे जाणारा डॉ. आंबेडकर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

"मुंबईत पावसामुळे वाहतूक कोंडी झाली होती.परंतु वाहतूक पोलीसांकडून वाहतूक नियंत्रणात आणण्यात आली. तसेच मुंबईतील पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झालेल्या मार्गाची त्यासोबत पर्यायी मार्गांची माहिती वाहतूक पोलिस वेळोवेळी सोशल मीडियावर दिली जात आहे."

- एम.रामकुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त ,मुंबई वाहतूक पोलीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT