Kishori Pednekar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Kishori Pednekar : किशोरी पेडणेकर यांच्यावर मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

संतोष कानडे

मुंबईः मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर 'एसआरए'प्रकरणी मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात वांद्रे येथील निर्मल नगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. पेडणेकरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे.

'एसआरए'चं प्रकरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. गोमाता एसआरए प्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला असून मागच्या काही महिन्यांमध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले होते.

काही दिवसांपूर्वी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत झालेल्या फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबई महापालिकेकडून कारवाईही झालेली.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किशोरी पेडणेकर यांचे वरळीमधील गोमाता नगरमधील कार्यालय आणि घर सील करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने किशोरी पेडणेकर यांचे एसआरए कायद्यानुसार घर आणि कार्यालय सील केले होते. किशोरी पेडणेकरांसाठी हा खूप मोठा धक्का समजला जातोय.

किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए योजनेवरुन गंभीर आरोप केले होते. या योजनेवरून त्यांची चौकशीही करण्यात आली होती. तर किशोरी पेडणेकर यांनी एसआरए योजनेतर्गत बांधलेल्या सदनिका बळकावल्याचा आरोपही भाजप नेते किरीट सोमाय्या यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने किशोरी पेडणेकर यांच्या वरळीतील संबंधित वादग्रस्त सदनिका सील केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bangalore Highway : 92 पिलर अन् 3.47 किमी लांबी! पुणे-बंगळूर महामार्गावरील सर्वात मोठा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार? लोकार्पण लांबणीवर, वाचा नवीन अपडेट

ICAI CA Toppers List : डोंबिवलीचा सुपुत्र देशभर गाजला! सोहन मांजरेकर ठरला देशातील तिसरा CA टॉपर; संपूर्ण टॉपर यादी पाहा

Shubman Gill:'गिलला टी-२० संघातून का डच्चू दिला?' मोहम्मद अझरुद्दीनचा BCCI ला थेट सवाल

Eknath Shinde यांनी लोकसभेतील संख्याबळाचे गणित बदललं! NDA मध्ये बनतील शक्तिशाली नेते; जागांचे गणित पाहा...

Farmer Protest: कर्जमुक्तीच्या लढ्याचा वणवा राज्यभर! तहसील कार्यालयावर व पाण्याच्या टाकीवर चढले शेतकरी, बुलडाण्यात आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT