Mumbai Fire esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Fire : घाटकोपरमध्ये लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; बचावकार्य जोमाने सुरु

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबईतल्या घाटकोपर पूर्व भागातील एका एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती असून दोघे जण गंभीर जखमी झालेले आहेत.

घाटकोपर पूर्व भागात असलेल्या पारख रुग्णालयाशेजारी असलेल्या एका इमारतीला ही भीषण आग लागली आहे. ग्राऊंड फ्लोअरवर एक हॉटेल आहे. या हॉटेलच्या मागच्या बाजूला आग लागली. काही क्षणांमध्ये ही आग पहिल्या आणि दुसऱ्या माळ्यापर्यंत गेली. या घटनेमध्ये कुर्शी देधिया या ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हेही वाचाः काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

ही आग लेव्हल-वन असल्याचा दावा बीएमसीने केला आहे.घटनास्थळी अग्मिशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत. शिवाय काही स्थानिक लोकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे शेजारील रुग्णालयात गंभीर आजार असलेले व्हेंटिलेटरवचे रुग्ण उपचार घेत आहेत. काहींना चालताही येत नाही, असेही रुग्ण आहेत.

सुरुवातीला ही आग पारख रुग्णालयाला लागल्याचं सांगितलं जात होतं. मात्र ही रुग्णालयाशेजारील इमारतीला लागली आहे. आता आग आटोक्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT