Eknath shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath shinde: मुंबई तुंबल्याने CM शिंदे लवकरच उचलणार मोठं पाऊल? 'त्या' आदेशाची रंगली चर्चा

पहिल्याच पावसाने सरकारच्या 'कारभारा'चे काढले वाभाडे

अंकिता खाणे (Ankita Khane)

जून महिना संपत आल्यानंतर राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तर राज्यातल्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. तर पावसाळ्यापूर्वी मुंबईत करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेत. मात्र या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येत आहे.(Latest Marathi News)

पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहील आहे. पावसाळ्यापूर्वी झालेल्या नालेसफाईवरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. या भोंगळ कारभाराला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुंबईतील प्रमुख नाल्यांची सफाईची पाहणी केली होती.(Latest Marathi News)

नालेसफाई झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचणार नाही तसेच मुंबईकरांना कसलाही त्रास होणार नाही असं आश्वासन मुख्यंमत्र्यांनी दिलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नालेसफाई चांगल्या प्रकारे केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हंटले होते.(Latest Marathi News)

मान्सूनपूर्व पावसाने मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे वाभाळे काढल्याचे चित्र पहिल्याच पावसामुळे दिसून आले आहे. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन फेल झाल्याचे चित्र दिसत असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष निलेश भोसले यांनी म्हटले आहे.(Latest Marathi News)

तर पहिल्याच दिवशी मुंबईची तुंबई झाल्याने पालिकेच्या नालेसफाईवर प्रश्नउपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मुंबईतल्या नालेसफाईचा आढावा घेतला होता. यावेळी मुंबईत पाणी न तुंबल्यास आधिकाऱ्यांची शाल श्रीफळ देऊन सत्कार करू, पाणी तुंबल्यास आधिकाऱ्यांला नारळ देऊ असा गार्भित इशारा शिंदेंनी दिला होता.(Latest Marathi News)

मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतरही शहरात विविध ठिकाणी पाणी तुंबल्याने विरोधकांनी मात्र त्यावर बोट ठेवत सोशल मिडियावर टिकेची झोड उठवली. मुख्यमंत्र्याच्या कारवाईच्या वक्तव्यानंतर पहिल्याच पावसात मुंबई तुंबल्याने मुख्यमंत्री आता पालिका आधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT