Mumbai Ganapati sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Ganapati : 'लालबागचा राजा' आणि 'मुंबईचा राजा' यांचे प्रथम दर्शन आज

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा व गणेशगल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजासुद्धा यंदा भक्तांच्या भेटीला येणार आहे.

नमिता धुरी

मुंबई : यंदा दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईत गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. गल्लोगल्ली त्या-त्या ठिकाणचे राजे विराजमान होत असतात; पण त्यातही लालबाग परिसरातील गणेशोत्सवाला विशेष मान आहे.

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजा व गणेशगल्लीचा म्हणजेच मुंबईचा राजासुद्धा यंदा भक्तांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी मंडळाच्या वतीने आज लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवली जाणार आहे. याविषयी लालबागचा राजा मंडळाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली. (Ganesh Chaturthi 2022)

दरवर्षी लालबागचा राजा व मुंबईचा राजा हा ज्याठिकाणी विराजमान होतो तिथेच त्याची मूर्ती साकारली जाते. त्यामुळे आगमन मिरवणूक जरी नसली तरी हा प्रथम झलक दाखवण्याचा सोहळा अगदी उत्साहात पार पडतो.

लालबागचा राजा मंडळाच्या सर्व अधिकृत सोशल मीडियावर भक्तांना घरबसल्या गणपतीचे दर्शन घेता येणार आहे. हा सोहळा आज २९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता पार पडेल यानंतर विशेष फोटोशूट होणार असून लवकरच बाप्पाचे फोटो सुद्धा पाहायला मिळतील. जर का आपल्याला लालबागच्या राजाची पहिली झलक लाईव्ह पाहायची असेल तर या लिंक सेव्ह करून ठेवा.

https://www.youtube.com/user/LalbaugRaja/featured

https://www.facebook.com/LalbaugchaRaja/

मुंबईचा राजा म्हणजेच गणेशगल्लीचा राजा मंडळाने सुद्धा आज बाप्पाचे पहिले दर्शन आयोजित केले आहे. फेसबुक, इंस्टाग्रामसह सोशल मीडियावरून दर्शन घेता येईल. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २७ ऑगस्टला चिंचपोकळीचा चिंतामणीची आगमन मिरवणूक पार पडली. ढोल- ताशे, आरत्या- गजरात धुंद होऊन भाविक या मिरवणुकीत तल्लीन झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : जमीन व्यवहारात माझा संंबंध नाही, प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलंय- मुरलीधर मोहोळ

शेतकऱ्यांची दिवाळी गाेड! 'अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८४६ कोटींची मदत'; नेमकी किती जणांना मिळाली मदत?

IND vs AUS 1st ODI Live: १० मिनिटांच्या पावासनं १ षटक कमी झालं... आता तर एक तास झाला पाऊस पडतोय; जाणून घ्या किती षटकांची मॅच होणार

Diwali 2025: दिवाळीत दमा अन् सीओपीडीचा त्रास असणाऱ्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी? वाचा एका क्लिकवर

Parental Welfare Law : आई-वडिलांना वाईट वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही, पगारही कापला जाणार अन्...

SCROLL FOR NEXT