Mumbai High Court  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sarpanch Election : अविश्वास प्रस्तावामुळे सरपंचपदाचे उमेदवार अपात्र ठरत नाहीत - मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

दत्ता लवांडे

नवी मुंबई : सरपंचपदाच्या निवडणुकीबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अविश्वास प्रस्तावामुळे सरपंचपदाचे उमेदवार अपात्र ठरत नाहीत. पदावरून हटलेल्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढवता येऊ शकते असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

अधिक माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील काथोरा ग्रामपंचायतीतील हे संपूर्ण प्रकरण आहे. या ग्रामपंचायतमध्ये १ जानेवारी २०२१ मध्ये सुजाता गायकी या अनुसूचित जाती या प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्यावर ग्रामपंचायत बॉडीकडून अविश्वास घेण्यात आला आणि त्यांना पदावरून हटवण्यात आलं.

ग्रामपंचायतची पुन्हा निवडणूक लागली त्यावेळी गायकी यांनी परत सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. मात्र त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणल्यामुळे त्यांना निवडणूक लढता येणार नाही असा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांनी दिला. त्यानंतर सुजाता गायकी यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली.

नागपूर खंडपीठाने या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. जरी ग्रामपंचायतीने त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव संमत केला असला तरी त्या व्यक्तीला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय खंडपीठाने दिला आहे.

ग्रामपंचायत अधिनियमामध्ये जर एखादा सरपंच अपात्र झाला तर त्याला परत निवडणूक लढवता येत नाही. पण जर एखाद्या सरपंचावर अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आणि त्याचे पद गेले असेल तर पुन्हा लागलेल्या निवडणुकीत त्याला उमेदवारी अर्ज भरता येतो असा निर्णय देण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT