महाराष्ट्र बातम्या

Mumbai Airport : मुंबई विमानतळावरुन एकाच दिवशी २५० विमानांचं उड्डाण होणार रद्द; नेमकं कारण काय?

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन एकाच दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल २५० विमानांचं उड्डाण रद्द होणार आहे. काही विमानांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत. येत्या १७ ऑक्टोबर रोजी धावपट्टी बंद असणार आहेत.

मुंबईमधलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अत्यंत व्यग्र असलेलं विमानतळ आहे. लाखो प्रवाशांना या विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो. त्यामुळे ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहेत.

डागडुजीच्या कामासाठी येत्या १७ ऑक्टोबर रोजी मुंबई विमानतळावरील धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल २५० विमान उड्डाणं रद्द किंवा त्यांच्या वेळांमध्ये बदल होऊ शकतो. त्याबद्दलची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.

विमानांचं लँडिंग आणि टेकऑफ सुरळीत व्हावं, यासाठी पावसाळ्याच्या अगोदर आणि पावसाळ्यानंतर धावपट्ट्यांची डागडुजी केली जाते. पावसाळ्यापूर्वी हे काम करण्यात आलेले होते. आता पावसाळ्यानंतर डागडुजीचे काम होणार आहे. विमानतळाचे संचलन करणाऱ्या 'मिआन' कंपनीने यासंदर्भात माहिती दिली आहे.

दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत डागडुजीच्या कामामुळे धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी १८ ऑक्टोबर २०२२ रोजी डागडुजी करण्यात आलेली होती. त्यानंतर यंदा पावसाळ्यापूर्वी हे काम उरकण्यात आले. आता पावसाळा संपल्यानंतर पुढच्या महिन्यात डागडुजी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H5N5 Virus: 'बर्ड फ्लू'च्या दुर्मिळ विषाणूचा धोका वाढला, 'इथे' झाला पहिला मृत्यू; आरोग्य विभागाकडून निवेदन

Agriculture News : द्राक्षपंढरीची व्यथा! 80% उत्पादन घट, आता निर्यातक्षम द्राक्ष तपासणीच्या 10 हजार खर्चाचा बोजा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

Latest Marathi News Live Update : पेण नगरपालिकेच्या वतीने मतदारांसाठी जनजागृती रॅली

आमदारांना ओळखलं नाही अन् उभा न राहिल्यानं डॉक्टरना, नोटीस बजावणं असंवेदनशील; हायकोर्टानं सरकारला फटकारलं

IND vs SA, 2nd Test: दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ तंबूत, भारताच्या कुलदीप यादवला ३ विकेट्स; पहिल्या दिवशी काय घडलं?

SCROLL FOR NEXT