Mumbai-Jaipur Exp Firing Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jaipur-Mumbai Exp Firing: "फक्त मोदी अन् योगीच..", एक्सप्रेसमध्ये गोळीबार केल्यावर कॉन्स्टेबलने घेतले ठाकरेंचेही नाव, Video Viral

मुंबई-जयपूर एक्सप्रेसमध्ये आज पहाटे झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आज (सोमवारी) पहाटे ५ च्या सुमारास झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिस कॉन्स्टेबल चेतन सिंह याने या चौघांना गोळ्या घातल्या. आता या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गोळ्या झाडणारा चेतन सिंह हातात बंदूक घेऊन प्रवाशांना धमकावताना दिसत आहे. त्याच्या पायाजवळ एका प्रवाशाचा मृतदेहही पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?

जयपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेसच्या ३ बोगींमध्ये गोळीबाराची घटना घडली. यात आरोपी चेतन सिंहने एएसआय टिकाराम मीना आणि इतर 3 प्रवाशांना गोळ्या घालून ठार केलं आहे. या घटनेनंतर चेतन सिंहने बोगीतील इतर प्रवाशांना धमकावल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यापैकी एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये आरोपी चेतन विरुद्ध दिशेला तोंड करून उभा असल्याचं दिसून येत आहे. त्याच्या हातात बंदूक आहे.

व्हिडिओमध्ये आरोपी चेतनने मोदी अन् योगींचे घेतलं नाव

व्हिडिओमध्ये चेतन सिंह बोलताना दिसत आहे. हे लोक पाकिस्तानमधून ऑपरेट झाले होते. म्हणून त्यांना मारल्याचं तो सांगतो. आपली माध्यमेही हेच सांगतील. भारतात रहायचं असेल, तर केवळ मोदी आणि योगीच..., आणि तुमचे ठाकरे असेही चेतन सिंह या व्हिडिओत म्हणताना दिसून येत आहे. त्यामधील त्याचे काही शब्द निटसे ऐकू येत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT