Rohit Pawar vs Ram Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar Vs Ram Shinde: रोहित पवारांचे राम शिंदेंना आव्हान; हिंमत असल्यास..

आरोप-प्रत्यारोपांची रणधुमाळी: रोहित पवारांची राम शिंदेंना खुली चर्चेची आव्हान

सकाळ डिजिटल टीम

Rohit Pawar: कर्जत-जामखेड येथे औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चित केलेली नीरव मोदी यांची असल्याचा माजी मंत्री राम शिंदे यांनी लावला आहे. हा आरोप खोडून काढत युवा आमदार रोहित पवार यांनी हिंमत असल्यास संबंधित जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिले.

आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड येथे औद्योगिक क्षेत्र विकसित व्हावे, यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी त्यांनी पावसाळी अधिवेशनात आंदोलन केले होते. त्यानंतर आज गुरुवारी ते उपराजधानीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात कर्जत-जामखेड येथे औद्योगिक वसाहत होण्याच्या मागणीचे जॅकेट घालून एंट्री केली.

यासंदर्भात अधिक सांगताना ते म्हणाले,‘आम्ही संपूर्ण पाहणी करून ४५० हेक्टर जागा निश्चित केली आहे. तिथे मोठ्या कंपन्या याव्यात आणि त्या माध्यमातून २० हजार युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

त्यानुषंगाने दोन महामार्ग तयार करण्याच्या प्रयत्नांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्यामुळे यश आले आहे. निश्चित केलेल्या जागेला कुणाचाही विरोध नाही. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीदेखील ती जागा योग्य असल्याचे म्हटले आहे.

त्या जागेसंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव पारित केला आहे. केवळ या औद्योगिक क्षेत्रापोटी बागायती जमीन जाऊ नये, अशी मागणी ग्रामपंचायतने केली होती. त्यानुसार तेवढी बागायती जमीन सोडण्यात आली आहे. परिणामत: राम शिंदे यांनी लावलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. त्यांनी हिंमत असेल तर कधीही यावे. मी ती जमीन नीरव मोदींची आहे की नाही याबाबत चर्चा करायला तयार आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT