महाराष्ट्र बातम्या

Mumbai Local:संतापजनक! मुंबईत चालत्या लोकलवर समाजकंटकांकडून दगडफेक, ५ ते ६ खिडक्या फुटल्या

चर्चगेट ते विरार या मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलवर बोरिवली ते कांदिवली या स्थानकांदरम्यान दगडफेक करण्यात आली.

Manoj Bhalerao

Mumbai Local Stone pelting: मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाईन समजलं जातं. ज्या दिवशी मुंबई लोकलच्या एखाद्या मार्गावर मेगाब्लॉक लावला जातो तेव्हा मुंबईकरांची तारांबळ उडते. मात्र, मुंबईकरांच्या लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली आहे. सुदैवाने या दगडफेकीत कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. बोरिवली लोहमार्ग पोलिसांना याबद्दल माहिती प्राप्त होताच त्यांनी घटस्थळावर जाऊन पाहणी केली.

चर्चगेट ते विरार या दोन स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकलवर दगडफेक झाल्याची घटना घडली. जेव्हा ही लोकल कांदिवली आणि बोरिवली या स्थानकांमध्ये धावत होती, तेव्हा ही दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना दुपारी ३ वाजून ३८ मिनिटांनी घडली. याव दगडफेकीत एसी लोकलच्या जवळपास पाच ते सहा खिडक्या तुटल्या असल्याची माहिती मिळाली आहे. या दगडफेकीत सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

मात्र, एससी लोकलवर दगडफेक करणारे समाजकंटक कोण आहेत?याचा तपास बोरिवली लोहमार्ग पोलीस करत आहे. (Latest Marathi News )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT