Devendra Fadnavis sakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : मोदींना वारंवार मुंबईत का यावं लागतंय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली दोन कारणं...

''पंतप्रधान मोदींच्या १९ सभा झाल्या. पहिलं कारण जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्यासोबत होती तेव्हा मोदीजींच्या तेरा सभा झाल्या होत्या. तेव्हा चार टप्प्यात मतदान होतं, प्रत्येक टप्प्यात तीन-चार दिवसांचा अंतर होतं, त्यामुळे काही लिमिटेशन्स होते. आता पाच टप्पे आहेत आणि साधारण सात दिवसांचं अंतर आहे.''

संतोष कानडे

Lok sabha election 2024 : मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींच्या जास्तीच्या सभा होत आहेत. मोदींना वारंवार मुंबईत किंवा राज्यात का यावं लागतंय, असा प्रश्न भाजपला विचारला जातोय. त्याचं उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

'टीव्ही ९ मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यामध्ये पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यामध्ये २० मे रोजी मतदान पार पडत आहे. मुंबई हा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला अजिबात नाही. मुंबई स्व. बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचा बालेकिल्ला आहे. कारण २०१४ मध्ये वेगवेगळं लढूनदेखील मुंबईमध्ये विधानसभेच्या आमच्या १५ जागा होत्या तर शिवसेनेच्या १४ जागा होत्या. तर महानगर पालिकेत त्यांच्या ८४ जागा होत्या आणि आमच्या ८२ जागा होत्या.

पंतप्रधानांना वारंवार महाराष्ट्रात आणि मुंबईत का यावं लागतं? या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मुंबईकरांचं मोदींवर विशेष प्रेम आहे. २०१४ मध्ये पंतप्रधानांच्या दोन सभा झाल्या होत्या. यावेळी एक रोड शो आणि एक सभा होतेय. मुंबई नॉर्थमध्ये रोड शो आणि साऊमध्ये सभा, असं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे मोदीजी वारंवार मुंबईत येताएत, असं म्हणणं चूक आहे.

राज्यात मोदींच्या जास्त सभा होण्यामागची दोन कारणं

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशामध्ये मोदीजी लोकांना हवे आहेत. मुंबईत त्यांचं विशेष आकर्षण आहे. आकर्षण असलेल्या व्यक्तीला बोलावलं जातं. जेव्हा मोदीजी नसतील तेव्हा आम्ही शिंदेंना फिरवतो. शिंदेजींचा रोड शो किंवा सभा उद्धवजींपेक्षा मोठ्या होतात.

फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या १९ सभा झाल्या. पहिलं कारण जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्यासोबत होती तेव्हा मोदीजींच्या तेरा सभा झाल्या होत्या. तेव्हा चार टप्प्यात मतदान होतं, प्रत्येक टप्प्यात तीन-चार दिवसांचा अंतर होतं, त्यामुळे काही लिमिटेशन्स होते. आता पाच टप्पे आहेत आणि साधारण सात दिवसांचं अंतर आहे, त्यामुळे स्कोप जास्त होता. प्रत्येक टप्प्यात तारीख मिळाली, त्यामुळे सभा झाल्या.

दुसरं कारण सांगताना फडणवीस म्हणाले, यावेळी आमच्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. परंतु त्यांचे इतर दोन पक्षांमुळे मतं विभागले जावू शकतात. त्यामुळे त्यांचेही मतदारसंघ आम्ही फोकस केले. पूर्वी धाराशिव, लातूर दोन मतदारंसघांची एकत्रित सभा औश्यात व्हायची. आता मात्र आम्ही स्वतंत्र सभा घेतल्या. त्यामुळे सभा वाढल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT