ramdas athawale on prakash ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Athawale: प्रकाश आंबेडकरांना आजही ऑफर, त्यांनी तिकडे जाऊ नये; आठवलेंचं स्पष्टीकरण

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात बैठका सुरु असून ते एकत्र येतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर यांनी साद घालत पक्षाचं अध्यक्षपद देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भातील स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.

आज महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबईत चैत्य भूमीवर लाखोंचा जनसमूदाय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहे. रामदास आठवले यांनी आज प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. सध्या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्रात शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उभय नेत्यांमध्ये बैठका सुरु आहेत.

यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, भीमशक्ती खऱ्या अर्थाने टिकवून ठेवण्याचं काम मी केलं आहे. २०११ मध्ये बाळासाहेबांनी हाक दिल्यानंतर मी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आज मी भाजपसोबत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. आमचीच खरी शिवशक्ती-भीमशक्ती आहे. प्रकाश आंबेडकरांची भीमशक्ती नसून वंचित शक्ती आहे.

पुढे बोलतांना आठवले म्हणाले की, अजूनही माझ्याकडून प्रकाश आंबेडकरांना ऑफर कायम आहे. त्यांनी माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं. कारण एक विचार, एक पक्ष ही काळाची गरज असून बाबासाहेबांचा पक्ष जिवंत ठेवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT