महाराष्ट्र बातम्या

खासगी बॅंकांही राबवणार राष्ट्रीय पेन्शन योजना

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राष्ट्रीय पेन्शन योजनेला (एनपीएस) जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी पेन्शन फंड नियामक आणि विकास महामंडळाने (पीएफआरडीए) "एनपीएस' खासगी क्षेत्रासाठी खुली केली आहे. राज्यात "पीएफआरडीए'कडून राज्यामध्ये "एनपीएस लाओ, अच्छे दिन पाओ' ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत "एनपीएस' स्वीकृती केंद्र वाढवली जाणार असून, खासगी बॅंका आणि वित्त सेवा संस्थांना एनपीएस वितरणासाठी भागीदार केले जाणार आहे.

नुकताच सरकारने "एनपीएस'ची वयोमर्यादा 60 वरून 65 केली होती. "एनपीएस'च्या खासगी क्षेत्रामधील वृद्धीसाठी "पीएफआरडीए'ने पॉइंट्‌स ऑफ प्रेझेन्स ही मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत सार्वजनिक बॅंका, खासगी बॅंका आणि वित्तसेवा पुरवठादार कंपन्या "एनपीएस'चे वितरण करणार आहेत. नागरिकांना उतारवयातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी निवृत्ती वेतनाच्या स्वरूपामध्ये प्रमाणित निवृत्ती उत्पन्न देणाऱ्या "एनपीएस'ची जनजागृती केली जाणार आहे. "एनपीएस लाओ, अच्छे दिन पाओ' ही मोहीम 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान राबवली जाणार आहे. किमान 500 रुपयांमध्ये एनपीएस खाते सुरू करता येईल. शिवाय eNPS च्या माध्यमातूनही नवे एनपीएस खाते सुरू करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT