महाराष्ट्र

प्रलंबित वेतन आता रोखीने

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वेळेत मिळावे यासाठी सध्या ते पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. पण बॅंक खाते आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे काही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जून 2017 पासूनचे मानधन रखडले असून, ते सध्या जुन्या पद्धतीने म्हणजे रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
विशेष मोहीम राबवून डिसेंबर 2017 पर्यंत उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बॅंक खाती आधार कार्डशी संलग्न करण्यात यावीत आणि कोणत्याही परिस्थितीत जानेवारी 2018 पासून त्यांचे मानधन थेट बॅंक खात्यात जमा करण्यात यावे, असे निर्देश महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आयसीडीएस (एकात्मिक बालविकास सेवा योजना) आयुक्तालयास दिले. राज्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांची संख्या 2 लाख 2 हजार इतकी आहे. पूर्वी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन रोखीने दिले जात असे. परंतु मानधनाच्या प्रक्रियेस विलंब लागत असे. हा विलंब टाळण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पीएफएमएस प्रणालीद्वारे थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची पद्धती अवलंबिण्यात आली. या पद्धतीत मधील सर्व टप्पे रद्द होऊन आयसीडीएस आयुक्तालयातून थेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात मानधन जमा होऊ लागले.

त्यामुळे मानधनासाठी लागणारा विलंब टळला आहे. यासंदर्भात आयसीडीएस आयुक्त कमलाकर फड म्हणाले, की पीएफएमएस प्रणालीअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 92 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश झाला असून, सध्या त्यांचे मानधन थेट बॅंक खात्यात जमा होत आहे. उर्वरित साधारण 10 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यांची बॅंक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे त्यांचे जून 2017 पासूनचे मानधन अदा करता आलेले नाही. सध्या या कर्मचाऱ्यांना जून ते डिसेंबर 2017 पर्यंतचे मानधन जुन्या पद्धतीने म्हणजे रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी झाला असून, त्यांना प्रलंबित मानधन तातडीने रोखीने अदा केले जाणार आहे, असे फड यांनी सांगितले.

जानेवारीपासून मानधन खात्यात जमा होणार
पंकजा मुंडे यासंदर्भात म्हणाल्या, की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांचे मानधन वेळेत मिळणे आवश्‍यक आहे. यासाठीच महिला बालविकास विभागाने पुढाकार घेऊन अत्याधुनिक अशी पीएफएमएस प्रणाली विकसीत केली आहे. पण काही तांत्रिक कारणास्तव साधारण 10 हजार अंगणवाडी कर्मचारी अद्याप या पद्धतीत येऊ शकलेले नाहीत. या कर्मचाऱ्यांची बॅंक खाती आधार कार्डशी संलग्न करून त्यांना पीएफएमएस प्रणालीत आणण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर 2017 अखेर या कर्मचाऱ्यांना पीएफएमएस प्रणालीअंतर्गत आणून जानेवारी 2018 पासून त्यांचे मानधनही थेट बॅंक खात्यात जमा करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी आयसीडीएस आयुक्तालयास दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT