sunday mumbai central railway mega block  sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या; मध्य रेल्वेवर रविवारी पाच तासांचा घेलता जाणार पॉवर ब्लॉक!

सकाळ डिजिटल टीम

Mega Block on Mumbai local : मध्य रेल्वेने विविध पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यासाठी टिटवाळा ते कसारा स्थानकांदरम्यान अप-डाऊन मार्गावर पाच तासांचा वाहतूक आणि पॉवरब्लॉक घेतला आहे. हा ब्लॉक शनिवारी (ता. २८) रात्री १२ वाजून ३० मिनिटांपासून ते रविवारी (ता. २९) पहाटे पाच वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे.

या कालावधीत उपनगरीय लोकल आणि मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, काही लोकल रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

रात्रकालीन ब्लॉकमध्ये उंबरमाळी-कसारा स्थानकांदरम्यानचा पूल, आसनगाव ते आठगावदरम्यान पुलाचा गर्डर रोड क्रेनच्या साह्याने टाकण्यात येणार आहे. तसेच मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून कसारा स्थानकात ४.५ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचे गर्डर टाकण्यात येणार आहे.

शिवाय खडवली-वासिंद स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेचे कामही करण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रविवारी सकाळी ६.११ वाजता आसनगावहून सुटणारी सीएसएमटी लोकल कल्याण स्थानकातून सुटेल. तसेच ब्लॉक कालावधीत टिटवाळा ते कसारा दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.

शनिवारी रात्री ‘या’ लोकल रद्द

रात्री १०.५० : सीएसएमटी-कसारा

रात्री १२.१५ : सीएसएमटी-कसारा

पहाटे ५.२८ : कल्याण-सीएसएमटी

सकाळी ६.११ : आसनगाव-सीएसएमटी

पहाटे ३.५१ : कसारा-सीएसएमटी

पहाटे ४.५९ : कसारा-सीएसएमटी

शनिवारी शेवटची लोकल

रात्री ९.३२ : सीएसएमटी-कसारा

रात्री १० : कसारा-सीएसएमटी (कल्याणपर्यंत)

रविवारी पहिली लोकल

सकाळी ७.०३ : कल्याण-कसारा

सकाळी ६.१० : कसारा-कल्याण

मेल-एक्स्प्रेसच्या वेळेत बदल

ब्लॉक कालावधीत लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार ट्रेन क्र. १२१४१ एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस पहाटे ४ वाजता, ट्रेन क्र. ११०५७ सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस पहाटे ४.१० वाजता, ट्रेन क्र. १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस पहाटे ४.३० वाजता, ट्रेन क्र. २२१७७ सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस पहाटे ४.२० वाजता, ट्रेन क्र. २२५३८ एलटीटी-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेस पहाटे ४.४५ वाजता सुटणार आहेत; तर अप दिशेने म्हणजे मुंबईकडे येणाऱ्या अनेक मेल-एक्स्प्रेसना इगतपुरी, भुसावळ आदी स्थानकांत काही तासांसाठी थांबविण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT