Mumbai Municipal Election Vote for BJP for Balasaheb Thackeray Devendra Fadnavis politics  sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Municipal Election : बाळासाहेबांसाठी भाजपला मते द्या; देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिका निवडणूक : फडणवीस यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईसाठी बघितलेले स्वप्न त्यांचे नाव घेत जे निवडून आले त्यांनी धुळीला मिळवले, असा हल्ला करीत आता मुंबईला मोठे करण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपला मत द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईचा विकासनिधी काही कुटुंबांकडे साचला आहे, असा आरोपही त्यांनी केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार आणि पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर भ्रष्टाचाराचे, मराठी माणसाच्या नावाने केवळ राजकारण केल्याचे आरोप करीत फडणवीसांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. ठाकरे कुटुंबीयांचे थेट नाव न घेता ते इतके आत्मकेंद्रित होते की, स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत असा हल्लाही त्यांनी चढविला. राज्यातील सरकारपेक्षाही मुंबईची महापालिका यांना महत्त्वाची वाटते. त्यामागचे कारण सेवा नसून फायदा असल्याचा घणाघातही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, की निवडणूक आली की कोणतीही भरीव कामगिरी न केलेली ही मंडळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची ओरड सुरु करतात. भावनिक राजकारण पेटविण्याचा प्रयत्न सुरु होतो.

मुंबईकराकडे ज्यांनी कधीही बघितले नाही. त्यांना सोडून आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आहे. गेल्या निवडणुकीतील भाजपचा स्ट्राईक रेट लक्षात घेत आता आणखी पुढे जायचे आहे. मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिले आहे, जे स्वप्न बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले आहे. ते पूर्ण करण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबई महापालिकेला पडलेला भ्रष्टाचाराचा मोठा विळखा सोडवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

परिवारवाद संपवा : शेलार

आशिष शेलार म्हणाले, की यांनी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ४५ हजार कोटींचा असताना त्यांनी मुंबईसाठी काय केले? मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीस यांनी आणली. बुलेट ट्रेनने मोदी सरकारने आणली. ही लढाई घराणेशाहीच्या विरोधातील आहे. एक परिवार २५ वर्षे सत्तेवर आहे. मुंबईकर टाहो फोडत आहेत. आम्हाला लोकशाहीचे सरकार हवे आहे. महानगरपालिकेत मुंबईकरांना मुंबईकरांची सत्ता हवी आहे. ती देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Makar Sankranti : एकादशीला संक्रांत आल्याने गोंधळू नका! तिळगूळ खायचा की नाही? ज्योतिषतज्ज्ञांनी दिला शास्त्राधार

IND vs NZ: कठीण प्रसंगी धावून आला KL Rahul! जेमिसनला सिक्स मारून शतक अन् मग लेकीसाठी स्पेशल सेलिब्रेशन; पाहा Video

Crime: लग्नात ४५ लाख खर्च, तरीही लोभ कायम; आधी हनिमून साजरा, नंतर पतीनं बोटीवर भयानक कट रचला, नवविवाहितेसोबत काय घडलं?

नाशिक येथे भरलेल्या तीन दिवसीय सत्ताविसाव्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे रविवारी अकरा जानेवारी रोजी सूप वाजले

Latest Marathi News Live Update : दिल्लाच्या तीस हजारी न्यायालयाने दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या ५ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावले

SCROLL FOR NEXT