mumbai  sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai News : कचखाऊ धोरणामुळे हिरे उद्योग सुरतला; सुप्रिया सुळे यांचा आरोप, उदय सामंत यांच्याकडून इन्कार

सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी ३,४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई -‘मुंबईतील हिरे उद्योग गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात आहे, ही खेदाची बाब आहे, ’ असे टीकास्त्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सोडले.

सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी ३,४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केले आहे. डिसेंबरमध्ये सुरत येथे हिरे बाजार सुरू होणार असून, सुरत हे देशाचे प्रमुख हिरे व्यापार केंद्र म्हणून मुंबईला मागे टाकण्यास सज्ज झाले आहे. त्यामुळे मुंबईतील हिरे व्यापारी गुजरातच्या सुरत डायमंड बोर्समध्ये तळ हलविण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याचा इन्कार केला आहे.

राज्य सरकार नवी मुंबईत सर्वात मोठ्या हिरे उद्योगाची उभारणी करत आहे. याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण होईल. जगातील सर्वात मोठा असा हा हिरे उद्योग असणार आहे

उदय सामंत, उद्योगमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींबाबतचं विधान चर्चेत, म्हणाल्या, ''पैसे दिले की महिला...''

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

विद्यार्थी आंदोलन झालं, पण आता पुढं काय? कॉकरोच जनता पार्टीनं स्पष्ट केली भूमिका

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

Nagpur POCSO Case : अल्पवयीन मुलीचे धर्मांतरण करून लग्न; नागपुरात पॉक्सोसह गुन्हा, मुख्य आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT