महाराष्ट्र

जिल्हा रुग्णालयांमध्ये "मेमरी क्‍लिनिक' सुरू करणार - डॉ. सावंत 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ जाणवत आहे. यासाठी राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये मेमरी क्‍लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला असून पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग येथे अशा रुग्णांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केली. 

राज्यात अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाणे येथील मनोरुग्णालयात दर आठवड्याला साधारणता 1400 जणांची तपासणी केली जाते. त्यातील किमान सहा ते सात रुग्ण अल्झायमर आणि स्मृतिभ्रंशाचे आढळून येत आहेत. सामाजिक भीतीपोटी बरेच रुग्ण उपचारासाठी पुढे येत नाहीत. याकरिता आरोग्य विभागामार्फत अभियान स्वरूपात जाणीवजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. या क्‍लिनिकच्या माध्यमातून अल्झायमरविषयी अर्ली डिटेक्‍शन सेंटर सुरू करण्यात येईल. त्याद्वारे रुग्णांच्या स्मरणशक्तीची विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येईल. स्मरणशक्तीविषयी येणाऱ्या अडचणींचे अवलोकन करून त्यांचे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर रुग्णावर औषधोपचार करण्यात येतील. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे आणि सिंधुदुर्ग या सहा ठिकाणी पहिल्या टप्प्यात डे केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत. त्यामध्ये रुग्णाच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील मालवणी भागातील आरोग्य विभागाच्या सामान्य रुग्णालयात टाटा कर्करोग रुग्णालयाच्या सहाय्याने 26 जानेवारीपासून कर्करोग निदान केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT