Uddhav-&-Devendra
Uddhav-&-Devendra 
महाराष्ट्र

पालघर पोटनिवडणूक न लढण्यासाठी शिवसेनेला गळ

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज "वर्षा' निवासस्थानी बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत शिवसेनेने पालघर पोटनिवडणूक लढवू नये, अशी विनंती शिवसेनेला केली असल्याचे समजते. लोकसभेच्या पुढील चार पोटनिवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

ठाकरे आणि फडणवीस यांची आज नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावर भेट झाली. या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस या दोघांमध्येच बंद दाराआड 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. यात पालघर येथील भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार देऊ नये, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याचे समजते.
लोकसभेत भाजपला 282 जागा मिळाल्याने स्पष्ट बहुमत आहे; मात्र राजस्थानमध्ये दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा विजय झाल्याने भाजपला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत; अजून चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यातील एक जागा पालघरची आहे. ही जागा भाजपसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे शिवसेनेने या ठिकाणी उमेदवार दिल्यास मतविभाजन होऊन विरोधकांना त्याचा फायदा होण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT