महाराष्ट्र

'डीएसकें'ना अटक होण्याची शक्‍यता

सकाळवृत्तसेवा

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी न्यायालयात 50 कोटी जमा करण्यात अपयश
मुंबई - गुंतवणूकदारांना फसविल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकेची शक्‍यता वाढली आहे.

गुंतवणूकदारांना देण्यासाठी पन्नास कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आश्‍वासन पूर्ण करण्यात "डीएसके' अपयशी ठरले. त्यामुळे आता त्यांना अटक होणार की ते स्वतःहून शरण येणार, हे पाहावे लागेल.

पुण्यामध्ये कुलकर्णी यांच्याविरोधात दोनशेहून अधिक फिर्यादी दाखल झाल्या आहेत. डीएसके समूहाच्या कायमस्वरूपी ठेवींमध्ये सुमारे 1350 गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले आहेत. पोलिसांतील तक्रारींमुळे अटक होण्याच्या शक्‍यतेने कुलकर्णी यांनी पत्नीसह अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याबाबत सविस्तर योजना दाखल करावी आणि आज (ता. 19) पर्यंत न्यायालयात पन्नास कोटी जमा करावे, असे आदेश न्या. अजय गडकरी यांनी मागील सुनावणीला दिले होते. कुलकर्णी यांनीही याबाबत हमीपत्र दाखल केले आहे. मात्र, ही रक्कम जमा करणे त्यांना शक्‍य झालेले नाही. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. रक्कम जमा करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आली होती. अधिक मुदत देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. पोलिसांनी त्यांची कारवाई करावी, असेही न्या. गडकरी यांनी स्पष्ट केले.

एकूण सुमारे दोनशे कोटींच्या वसुलीपैकी पन्नास कोटी रक्कम न्यायालयात जमा करा आणि कोणत्या मालमत्तेचा कसा लिलाव करून रक्कम जमा करणार, याचा तपशील देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या लिलावाच्या नफ्यातून गुंतवणूकदारांचे पैसे देण्याची हमी कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आली होती. रक्कम जमा करण्यात अपयश आल्यामुळे पोलिस त्यांना अटक करण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर कुलकर्णी स्वतःहून शरण येण्याचीदेखील शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT