purple fruit 
महाराष्ट्र बातम्या

जांभूळ शेतीतून समृद्धी! एका झाडापासून ४० हजारांपर्यंत उत्पन्न; मे महिन्यात मिळतो अधिक दर

सकाळ वृत्तसेवा

मनोर - पालघर तालुक्यातील बहाडोली गाव जांभळांसाठी प्रसिद्ध आहे. वैतरणा नदी किनारची गाळाची माती आणि दमट वातावरण जांभळांच्या झाडांना पोषक ठरते. जांभळाच्या झाडामागे ३० ते ४० हजारांचे उत्पन्न मिळत असल्याने पारंपरिक भात शेती सोडून शेतकरी जांभूळ लागवडीकडे वळत आहेत. जांभळांना भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत.

बहाडोली आणि खामलोली गावात जांभळाची सहा हजार झाडे आहेत. नव्याने दोन हजार झाडांची लागवड करण्यात आली. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात नवीन लागवड आणि जांभळाचे उत्पादन आणि फळाच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.

बहाडोलीच्या जांभळांना मुंबई आणि लगतच्या बाजारपेठेत मोठी मागणी असते. डिसेंबर महिन्यात जांभळाच्या झाडाला मोहोर आल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जांभळे काढणीसाठी तयार होतात. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दीड महिना जांभळांचा हंगाम सुरू राहतो.

फळावर प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची गरज

शेतकरी पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या फळांपासून रस निर्मिती आणि बियांपासून पावडर तयार करून विक्री करतात. मे महिन्यात जांभळाना मागणी मोठी असल्याने प्रतिकिलो हजार ते बाराशे रुपयांचा उच्चतम दर मिळू शकतो. एका झाडापासून सरासरी किमान तीनशे, तर कमाल पाचशे किलो जांभळांचे उत्पादन होते.

एक झाडापासून ४० हजारांपर्यंत उत्पन्न

बहाडोली गावाच्या परिसरात उच्च प्रतीच्या जांभळांचे उत्पादन देणारी सुमारे सहा हजार झाडे आहेत. जांभळाच्या एका झाडापासून हंगामात शेतकऱ्याला सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मधुमेहावर गुणकारी असल्याने जांभळाचा ज्यूस आणि बियांच्या पावडरला मोठी मागणी असते. उत्पन्न वाढीसाठी जांभळापासून ज्यूस आणि बियांपासून पावडर तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

"जांभूळ विक्रीतून गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. कृषी विभागाने आता जांभळाच्या भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न करावेत."

- अनिल पाटील, शेतकरी

"नवीन लागवड केलेल्या झाडांची उंचीत होणारी वाढ रोखण्यासाठी छाटणी करून झाडाचा विस्तार जमिनीलगत झाल्यास फळे तोडणी सोपी होईल."

- तरुण वैती, तालुका कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs KKR Live: ध्रुव जुरेलची भन्नाट स्टम्पिंग... कॅमेरून ग्रीन अम्पायरचा निर्णय येण्यापूर्वीच मैदानाबाहेर गेला... अशी चपळता क्वचितच पाहिली असेल Video

Pune Traffic: पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन पाठवणार, वाहतूक नियमभंगावर डिजिटल चाप..

SRH vs CSK: ए गप्प बसा... चेन्नईला पराभूत केल्यानंतर काव्या मारनच्या 'Silence' सेलिब्रेशनची चर्चा; Video Viral

iPhone 17e ची भारतात धमाकेदार एन्ट्री! मिळतायत Pro वाले फीचर्स; किंमत एवढी कमी, एकदा पाहाच

Team India News: श्रेयस अय्यरच नव्हे, तर IPL 2026 मधील ५ स्टार खेळाडू भारताच्या ट्वेंटी-२० संघात करू शकतात पुनरागमन

SCROLL FOR NEXT