महाराष्ट्र बातम्या

Ratan Tata: रतन टाटांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी निवासस्थानी जाऊन केला गौरव

Ratan Tata Udyog Ratna Award: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रतन टाटांना महाराष्ट्र शासनाचा उद्योगरत्न पुरस्कार

राहुल शेळके

Ratan Tata Udyog Ratna Award: रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी रतन टाटांना महाराष्ट्र शासनाचा 'उद्योगरत्न' पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करून गौरव केला.

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पुरस्काराचे स्वरुप

‘उद्योगरत्न’ पुरस्काराचे स्वरूप 25 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे आहे. ‘उद्योगमित्र’ पुरस्काराचे स्वरुप 15 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, ‘उद्योगिनी’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र तर ‘उत्कृष्ट मराठी उद्योजक’ पुरस्काराचे स्वरुप 5 लक्ष रुपये, सन्मान चिन्ह व मानपत्र असे आहे.

यावर्षीच्या एप्रिलमध्ये रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान, 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया'ने गौरवण्यात आलं होतं. तसेच त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. रतन टाटा यांच्या टाटा ग्रुपच्या कंपन्या दानशूरपणाबद्दल ओळखल्या जातात. 

टाटा उद्योग समूहाचे अध्यक्षपद भूषविलेल्या रतन टाटा यांचे भारतीय उद्योगांना जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यात महत्त्वाचे योगदान आहे. जग्वार, लॅण्ड रोव्हर, कोरस ग्रुप ऑफ स्टील कंपनी यासारख्या बड्या परकीय कंपन्यांची खरेदी करून टाटा उद्योग समूहाचे अधिराज्य निर्माण करण्यात रतन टाटा यांचा सिंहाचा वाटा आहे.

स्टील, ऑटोमोबाईल्स, टी कंपनी, लक्झरी हॉटेल्स, एरोनॉटिकल अशा विविध उद्योग क्षेत्रात टाटा उद्योग समूहाचे नाव आहे. ‘टेटली’ ही टी बॅग्ज बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून नावारुपास आली आहे. दानशूर उद्योगपती म्हणूनही रतन टाटा यांचा लौकिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांचे होणार “आर्थिक ऑडिट”... आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणार

Kolhapur News : पालकमंत्री आबिटकरांनी झापल्यानंतर महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना नोटीस, तर कनिष्ठ अभियंता निलंबित

Nagpur : नागपुरात मेंदूज्वर सदृश्य आजाराचा धोका, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू

Fastag : फास्टॅग नाही किंवा पुरेसा बॅलन्स नाही, काळजी करू नका; UPI द्वारे देऊ शकता टोलचे पैसे  

Cough Syrup Warning : डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या कफ सिरप, बालकांच्या मृत्यूनंतर सूचना; सर्दी, खोकल्‍याची औषधे बालकांना देऊ नका

SCROLL FOR NEXT