Sandeep Deshpande Driver Arrested | Loudspeaker controversy
Sandeep Deshpande Driver Arrested | Loudspeaker controversy e sakal
महाराष्ट्र

संदीप देशपांडे अद्यापही फरार, पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक

सकाळ डिजिटल टीम

Loudspeaker Controversy: मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले होते. त्यावेळी एक महिला पोलिस देखील जखमी झाली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज संदीप देशपांडेंच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. पण, संदीप देशपांडेंसह संतोष धुरी दोघेही अद्याप फरार आहेत. (Sandeep Deshpande News)

संदीप देशपांडे ज्या गाडीतून पळाले होते त्या गाडीच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. यासह दोन अन्य आरोपींना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबई पोलिस सध्या संदीप देशपांडेंसह संतोष धुरीचा शोध घेत आहेत. दोघांनीही आपले मोबाईल बंद करून ठेवले आहेत. त्यामुळे त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यात अडचणी येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय? -

राज ठाकरेंनी ३ मे रोजी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांना भोंग्याबाबत आदेश दिला. मशिदीवरील भोंगे उतरत नसतील तर मशिदीपुढे भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजवा, असं ते म्हणाले होते. त्यानुसार कार्यकर्त्यांनी ४ मे रोजी पहाटेपासून मशिदीसमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. इमारतींवर चढून भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजविण्यात आली. यावेळी मुंबई पोलिसांनी मनसे सैनिकांची धरपकड केली. पोलिस संदीप देशपांडेंच्या मागावर होते. देशपांडे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतिर्थ निवासस्थानी आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. त्यानंतर ते पोलिसांना चकवा देत पळून गेले. यावेळी देशपांडेंची पोलिसांसोबत झटापट झाली. यामध्ये एक महिला पोलिस जखमी झाली. त्यानंतर देशपांडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT