Mukesh Ambani esakal
महाराष्ट्र बातम्या

मुकेश अंबानींना धमकी देणारा ताब्यात; मुंबई पोलिसांची धडक कारवाई

अंबानींना कुटूंबाला धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

धनश्री ओतारी

रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँड लाईनवर आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फोन करुन अंबानी कुटुंबाला धमकी दिली होती. अँटिलिया प्रकरणानंतर अंबानी कुटुंबाला पुन्हा धमकी देण्यात आली. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फोनवर 3 ते 4 वेळा फोन करून धमक्या देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पकडण्यात मुंबई पोलिसांनी यश आले असून त्याची ओळख पटली आहे.(mumbai police arrested suspect who threatened mukesh ambani)

अंबानींना कुटूंबाला धमकी देणारा मुंबई पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. गिरगावातील एचएन रिलायन्स रुग्णालयामध्ये तीन ते चार वेळा फोन करुन धमकी देण्यात आली होती. तसेच, फोन करणारी व्यक्ती ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी ताताडीने तपासाला सुरूवात केली. बोरिवलीतील एमएचबी कॉलनीमधून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं फोनवर आपलं नाव अफझल असल्याचं सांगितलं होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी देणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च भाषा वापरणे याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समोरील व्यक्ती हा वारंवार एकच बोलत होता, मी अंबानी कुटुंबीयांना मारणार आहे, त्यांना मरावेच लागणार आहे, असं तो फोनवर बोलत होता. पोलिसांनी हे फोन कॉल रेकॉर्ड ऐकले आणि पुढील तपास सुरू केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT