Mumbai Police Investigation Against ED e sakal
महाराष्ट्र बातम्या

ठाकरे सरकार इन अ‌ॅक्शन मोड! राऊतांच्या आरोपानंतर ED विरोधात तपास सुरू

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ईडीचे काही अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut Allegations on ED) यांनी केला होता. याबाबत त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला देखील पत्र लिहिले होते. आता मुंबई पोलिसांकडून ईडीचे अज्ञात अधिकारी आणि काही नेत्यांविरोधात तपास सुरू असल्याची माहिती मिळतेय. ईडी अधिकाऱ्यांविरोधात तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले होते. त्यांनी ईडीचे काही अधिकारी आणि भाजप नेते किरीट सोमय्यांवर आरोप केले होते. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार कारवाई करणार असल्याचं दिसतंय. मुंबई पोलिसांनी राऊतांच्या आरोपानंतर एसआयटी स्थापन केली असून तक्रारीमध्ये नावे असलेल्या व्यक्तींचा तपास करण्यात येणार आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त हे या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. या एसआयटीच्या माध्यमातून तपास करण्यात येणार आहे. प्राथमिक तपास करून अहवाल गृहमंत्र्याला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांना दाखवून दोघांच्या आदेशानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मिळतेय.

समाजात तेढ निर्माण होईल असं कृत्य करू नये. याबाबत आज बैठक होणार आहे. भडकावू भाषण करणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असंही गृहमंत्री म्हणाले.

संजय राऊतांचे आरोप नेमके काय? -

ईडी १०० पेक्षा अधिक व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल करतेय. जितेंद्र नवलानी हा व्यक्ती ईडीचं रॅकेट चालवतो. नवलानी हा कन्सल्टन्सी कंपनी चालवतो, असं सांगितलं जातं. पण, प्रत्यक्षात त्यांच्या कंपनात कोणीही कर्मचारी नाही. ईडी हे भाजपसाठी एटीएम मशीनप्रमाणे काम करतेय. देशातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराचं रॅकेट मुंबई आणि दिल्लीत बसून चालवतात. गेल्या २०१७ ला ईडीने ७ कंपन्यांची तपासणी केली. त्यानंतर या कंपन्यांमधून नवलानीच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा झाले. त्यानतंरच्या महिन्यात १५ कोटी जमा झाले. अविनाश भोसले यांची चौकशी केली त्यावेळी नवलानीच्या खात्यात १५ कोटी रुपये जमा झाले, असे गंभीर आरोप संजय राऊतांनी केले होते. याचे पुरावे पंतप्रधान कार्यालयाला देखील दिले असून काही नेते आणि अधिकारी तुरुंगात जातील, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: राहुल गांधींविरोधातील याचिकेवर CJI सूर्यकांत वकिलावर संतापले; अचानक सुनावणीचं थेट प्रक्षेपण बंद!

Tiger Shroff Firing: लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळल्या! साबरमती जेलमधील ‘दो सौ खोली’ हलविले

Pune Graduate election counting latest update : पुणे पदवीधर मतदार संघातील पहिली अपडेट आली समोर, लिंबू, बिबवे आढळल्याने गोंधळ

गुलाल आपलाच! मतमोजणी सुरू होताच कराळे मास्तरांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास; म्हणाले, ४०-४५ हजार मते मिळतील

Latest Marathi News Live Update : अमरावतीत लोकशाही भवनात मतमोजणी सुरू; १४ टेबलवर १४ हजार मतपत्रिकांची मोजणी

SCROLL FOR NEXT