Mumbai Crime News esakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai News : शाळेच्या वॉश रुममध्ये 18 वर्षीय तरुणाचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः मुंबईच्या मानखुर्द भागामध्ये मोठी घटना घडली आहे. एका १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह बाथरुममध्ये आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबईमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आज पुन्हा मुंबईतल्या मानखुर्दमध्ये तरुणाचा मृतदेह सापडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

हेही वाचाः ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

मुंबईतल्या मानखुर्द भागामध्ये असलेल्या एका शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. १८ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह वॉशरुममध्ये आढळून आल्याची माहिती पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून मृत तरुणाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत कसून चौकशी सुरु आहे. मानखुर्द भागामध्ये या घटनेने दहशतीचं वातावरण पसरलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT