airport esakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबई-पुण्यात दाट धुक्यामुळे उड्डाणे लांबली; विमान वाहतूक विस्कळीत

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात हवामान बदल दिसून आले आहेत.

सुधीर काकडे

राज्यात मागच्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. मुंबई (Mumbai), पुण्यासह अनेक ठिकाणी झालेल्या पावसाच्या सरींसोबतच सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसून आली आहे. धुक्याचं (Fog) प्रमाण जास्त असल्याने परिणामी दृष्यमानता कमी झाली होती. याचा थेट परिणाम हवाई वाहतूकीवर झाला असून, पुणे विमान तळावरील उड्डाणांवर याचा मोठा परिणाम दिसून आला आहे.

पुण्यात (Pune) दाट धुकं पसरल्याने सर्व उड्डाणं उशीरा करण्यात येणार आहे. पुणे विमान तळाने दिलेल्या माहितीनुसार धुक्यांमुळे दृष्यमानता कमी झाली आहे. परिणामी विमानांच्या उड्डाणांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व प्रवाशांना आता या गोष्टीची नोंद घ्यावी लागणार आहे.

पुण्यातील लोहगाव परिसरात असलेल्या विमानतळाच्या परिसरात रात्रीपासूनच दाट धुकं पसरलेलं होतं. त्यामुळे रात्रीपासूनच दृष्यमानता कमी झालेली होती. त्यानंतर सकाळी विमानतळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तर मुंबईत देखील अनेक उड्डाणांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

ITI Students: आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आता वैदिक संस्कार अभ्यासक्रम; नेमकं काय शिकायला मिळणार?

साईबाबांनी स्वप्नात दर्शन देताच दूर झाला बॉलिवूड अभिनेत्रीचा रोग ! 'या' दिग्दर्शकाच्या होती प्रेमात

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

SCROLL FOR NEXT