uddhav and richard branson
uddhav and richard branson 
महाराष्ट्र

मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प मार्गी लावावा - रिचर्ड ब्रॅन्सन

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - मुंबई-पुणे ‘हायपरलूप’चा प्रकल्प नवीन सरकारनेदेखील मार्गी लावावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्जिन कंपनीचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी भेट घेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. हायपरलूप प्रकल्पाला यापूर्वीच्या सरकारने पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता दिलेली असल्याने नव्या सरकारकडूनही या प्रकल्पाला प्राधान्य दिले जावे, अशी विनंती ब्रॅन्सन यांनी केली आहे.    

१० अब्ज डॉलर खर्चाची मुंबई-पुणे हायपरलूप या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, गैरसमज यांविषयी सविस्तर माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वेळी देण्यात आली. मुंबई- पुणे प्रवासासाठी ३ तास लागतातच. मात्र हायपरलूपमुळे १५० किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत कापता येणार आहे. पहिला हायपरलूप मार्ग पुण्याहून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडला जाण्याचे नियोजन आहे. हायपरलूप ट्रेनचा ताशी वेग एक हजार किमी प्रतितास असणार आहे.

प्रवासी आणि कार्गोची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी हायपरलूपचा व्यावसायिक पातळीवर उपयोग केला जातो. हायपरलूपसाठी दिल्ली हे देखील योग्य शहर आहे. मात्र मुंबई - पुणे अत्यंत योग्य असून, आमची पहिली पसंती मुंबई - पुणेसाठी आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही आर्थिक साह्याची आवश्‍यकता नसून, खासगी गुंतवणूकदारांमार्फतच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आराखडा व्हर्जिन कंपनीने राज्य सरकारला सादर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT