Corona and Omicron sakal
महाराष्ट्र बातम्या

मुंबईकरांना दिलासा! सहा हजारांनी रूग्णसंख्या घटली

आज राज्यात ३३,४७० नवीन रुग्ण आढळले आहेत.

निनाद कुलकर्णी

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून 20 हजारांच्या घरात नोंद करण्यात येणाऱ्या मुंबईतील रूग्णसंख्येला सोमवारी काहीसा ब्रेक लागला आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 13 हजार 648 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दररोज 20 हजार रूग्णांच्या नोंदीनंतर आज 13 हजार 648 सापडल्याने नागरिकांसह प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के इतका नोंदविण्यात आला असून, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 411 इतकी झाली आहे. सध्या मुंबईत 1 लाख 3 हजार 862 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत सोमवारी 27 हजार 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात आज २९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर राज्यात आजपर्यत एकूण ६६,०२,१०३ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९५% एवढे झाले आहे. आज राज्यात ३३,४७० नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यात आज ८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०३% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,०७,१८,९११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९,५३,५१४ (९.८३ टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२,४६,७२९ व्यक्ती होमक्वारंटाईन मध्ये आहेत तर २५०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३१ कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये, पुणे - 28, पुणे ग्रामीण - 2, पिपरी चिंचवडमध्ये एका रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत राज्यात एकूण १२४७ ओमिक्रॉनबाधित रुग्ण सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT