cm eknath shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : ...नाहीतर लोक म्हणतील मुख्यमंत्री बदलला; एकनाथ शिंदेंनी सांगितलं ऊर्जेचं रहस्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरव

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः लोकांचा गराडा त्यांची कामं हेच माझं टॉनिक आणि ऊर्जा आहे. लोकांची कामे करावी लागणार आहेत, नाहीतर मुख्यमंत्री बदलला असे लोक म्हणतील. असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं आहे.

मुंबईत आयोजित 'सकाळ' सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. मुंबई सकाळचे संपादक राहुल गडपाले यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सरकार स्थापनेतील घडामोडी ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या कामकाजाचा आढावा मांडला.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, याआधी सत्तांतराचा प्रकार झाला तेव्हा मी त्या तीन दिवसांपैकी एक दिवस एक मिनिटही झोपलो नव्हतो. सध्या कामाचा नक्कीच भार आहे. लोकांना भेटणे, प्रशासकीय कामे आणि विभागाच्या मीटिंग असतात. जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे झोप कमी मिळते.

''पुढच्या दोन वर्षात मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही. मुंबईत जगभरातील लोक येतात. मुंबई फायनान्शिअल हब आहे. मुंबई जशी आहे, तशी लोकांना देण्याचे काम आम्ही करतो आहोत. मुंबईकरांना आगामी दोन वर्षात खड्डेमुक्त रस्ते देणार. सध्या ४०० किमी सीसी रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. आगामी काळात आणखी ४०० किमीचे खड्डेमुक्त रस्ते मुंबईकरांना देण्यात येतील.''

या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सकाळ सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुढे बोलतांना शिंदे म्हणाले, सध्या मुंबईत हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ७० दवाखाने सुरू झालेत. आगामी काळात आणखी १५० दवाखाने मुंबईकरांच्या घराजवळ सुविधा म्हणून उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये सर्व आरोग्याच्या सुविधा मुंबईकरांना मोफत मिळणार आहेत.

दावोस दौऱ्यात चांगला प्रतिसाद- शिंदे

आपल्या सरकारने १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. हे सगळे करार उद्योग आणण्यासाठी होते. दावोसच्या दौऱ्यात खूप सारा प्रतिसाद मिळाला आहे. मोठमोठे उद्योग महाराष्ट्रासाठी उपलब्ध होतील यासाठी पंतप्रधानदेखील पाठीशी उभे आहेत. जे करार दावोसमध्ये झाले आहेत, त्याची अंमलबजावणी होऊन लाखो रोजगार महाराष्ट्रासाठी उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT