Balasaheb Thackeray sanjay raut
Balasaheb Thackeray sanjay raut esakal
महाराष्ट्र

Sanjay Raut: सावरकरांच्या बरोबरीने बाळासाहेबांनाही भारतरत्न द्या; संजय राऊत म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबरोबरीने स्व. बाळासाहेब ठाकरे यांनाही भारतरत्न द्या, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्र सोडत अनेक आक्षेप घेतले.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने अनेक शिवसैनिक तसंच नेत्यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना फोटो शेअर करत अभिवादन केलं.

हेही वाचाः Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे ढोंगी वारसदार आहेत. ते जनतेची दिशाभूल करीत आहेत. मुळात बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आम्हीच आहोत आणि जीवनाच्या शेवटच्या श्वासासोबत त्यांच्या विचारांसोबत राहू, असं ते म्हणाले.

''वीर सावरकर यांना भारतरत्न का दिला जात नाही? तुमचं एवढंच प्रेम आहे तर सावरकरांच्या बरोबरीने बाळासाहेबांनाही भारतरत्न द्या'' असं आवाहन त्यांनी केंद्र सरकारला केलं. शिंदे गटाला उद्देशून बोलतांना राऊत म्हणाले की, बाळासाहेबांच्या नावाने तोतये निर्माण झालेले आहेत. मात्र ते टिकणार नाहीत. या महाराष्ट्रात ढोंग चालणार नाही, त्याला लाथ मारली पाहिजे. बाळासाहेबांनाही अशी ढोंगं आवडत नव्हती, असा चिमटा राऊतांनी काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: थोड्याच वेळात लागणार बारावीचा निकाल, कुठे चेक करायचा? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

HSC Result 2024 : १२ वी निकाल येण्याआधी पालकांनी या गोष्टी नक्की कराव्यात, मुलांना आधार मिळेल

Bigg Boss Marathi: प्रतीक्षा संपली! मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची घोषणा, यंदा महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

SCROLL FOR NEXT