Neel somaiya and kirit somaiya News Sakal
महाराष्ट्र बातम्या

नील सोमय्यांचादेखील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) अटकपूर्वी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता मुंबई सत्र न्यायालयाने सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांचादेखील अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. काल सकाळी या सर्व प्रकरणावर युक्तीवाद पूर्ण झाला होता. मात्र, न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यांनतर आज मुंबई सत्र न्यायालयाने सोमय्यांचा मुलगा नील सोमय्याचादेखील (Neil Somaiya) जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता किरीट सोमय्या पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली असून, या दोघांना अटक होणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे. (INS Vikrant Case Updates)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

किरीट सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 11 एप्रिल म्हणजेच, आज सुनावणी पार पडली. पण न्यायालयानं काल संध्याकाळी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. तर नील सोमय्यांच्या अर्जवर आज निकाल देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज न्यायालयाने किरीट सोमय्यांपोठोपाठ नील सोमय्यांचादेखील जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आयएनएस विक्रांत निधी प्रकरणात सोमय्या पिता-पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT