Sanjay Raut on prakash ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : 'कोण संजय राऊत?' प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नाला राऊतांचं उत्तर

संतोष कानडे

मुंबईः कोण संजय राऊत? या प्रकाश आंबेडकर यांच्या प्रश्नाला संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. शिवसेना आणि वंचित यांनी युती केलेली असली तरी दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बोलताना शरद पवार यांच्यावर निशाणा साधत 'शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, तुम्हाला लवकरच कळेल', असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

प्रकाश आंबेडकरांच्या या विधानावर संजय राऊत यांनी 'मविआ'चा भाग व्हायचं असेल तर प्रमुख स्तंभांवर बोलू नये, असं म्हटलं होतं. 'शरद पवार हे देशातल्या भाजपविरोधातल्या आघाडीच्या प्रयत्नातले प्रमुख स्तंभ आहेत. प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झाली आहे. ते महाविकास आघाडीचे घटक होतील. त्यामुळे त्यांनी प्रमुख स्तंभांवर बोलू नये' असा सल्ला संजय राऊतांनी दिला होता.

त्याला उत्तर देतांना प्रकाश आंबेडकर यांनी कोण संजय राऊत? असा प्रश्न आज उपस्थित केला होता. ते माझ्या पक्षाचे नाहीत, मी माझ्या पक्षाचं ऐकेन त्यांचं का ऐकू? असं आंबेडकर म्हणालेले.

त्यावर पुन्हा संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले की, मी कोण आहे हे उद्धव ठाकरे ठरवतील. मीही वंचित बहुजन आघाडीचा नाही. म्हणून माझ्याविषयी ठाकरेच ठरवतील असं राऊत म्हणाले. राऊतांनी माझ्यासाठी हा विषय संपला असं जाहीर केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर बोलणं टाळलं

आज सोलापुरातून बोलतांना प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या मुद्द्यावर बोलणं टाळलं आहे. मात्र महाविकास आघाडीबद्दल बोलले आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रयोग हा पोस्ट इलेक्शन आहे आणि शिवसेना-वंचितचा प्रयोग हा प्रि-इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांच्या जल्लोषावरुन ही युती यशस्वी होणार हे दिसून येतंय.

शिवसेना-वंचित युतीचा गाजावाजा होऊ नये म्हणून भाजपने राज्यपालांच्या राजीनाम्याचा मुद्दा पुढे केला. वास्तविक पंतप्रधानांकडे राजीनामा देणं, यात काहीही तथ्य नव्हतं. आमची युती ही २०२४ची विधानसभा आणि तोपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी असल्याचं आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT