Rupali Chakankar on Kuchik Case e sakal
महाराष्ट्र बातम्या

Rupali Chakankar : चित्रा वाघ-चाकणकर वाद चिघळला; महिला आयोगाची थेट कारवाई

संतोष कानडे

मुंबईः उर्फी जावेद प्रकरण आता आणखी तापू लागलं आहे. काल चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर आज आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांना नोटीस पाठवल्याची माहिती दिली.

रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ?

  • कारवाई करावी, की नाही हा राज्य महिला आयोगाचा अधिकार असतो

  • खोटी माहिती चित्रा वाघ यांनी काल दिली

  • तेजस्विनी पंडित हिला महिला आयोगाने कधीही नोटीस पाठवली नाही

  • दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवली होती.

  • चित्रा वाघ यांनी आकसापोटी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आयोगाविरोधात भूमिका घेतली

  • दोन समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न आणि आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांना नोटीस

  • १९९३ कलम ९२ (२) (३) नुसार नोटीस देण्यात आलेली असून त्यांनी खुलासा सादर करावा.

  • अन्यथा त्यांचे काहीही म्हणणे नाही असं गृहीत धरुन आयोग एकतर्फी निर्णय घेईल.

चित्रा वाघ यांची कालची पत्रकार परिषद

चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या दुटप्पीपणाचा पुरावाच यावेळी सादर केला. त्या म्हणाल्या की, महिला आयोगाने ट्विटरवच्या पोस्टची दखल घेत अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री तेजस्वीनी पंडित यांचं ते पोस्टर होतं. दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवल्याचं वाघ यांनी सांगितलं.

या पोस्टरमुळे समाजात धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन, असा चुकीचा संदेश जात असल्याने जनमाणूस आणि समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटत असल्याचं आयोगाने नमूद केलं होतं.

मात्र इथे उर्फी जावेद रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोगाला काहीच कसं वाटत नाही? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित करुन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार पुन्हा तेजीत, MCX चा शेअर 10,000 रुपयांवर; जाणून घ्या कोणते शेअर्स वाढले

Constitution Day: संविधान दिन विशेष मूळ संविधानाची प्रत, दुर्मिळ ग्रंथ, बाबासाहेबांच्या नोट्स ‘सिद्धार्थ’ने जपल्या खाणाखुणा

Latest Marathi News Live Update : नागपूर महानगरपालिका प्रारूप मतदार यादीसाठी मुदत वाढीची मागणी

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटीचा धागा बिहारपर्यंत; कोल्हापूर कनेक्शन उघड, पोलिसांच्या मौनामुळे संशय अधिक गडद!

CM Yogi Adityanath: मोबाईलवर दिसणार आपले शेत आणि घर! योगी सरकार नागरिकांना देणार मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT