Eknath shinde  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : अनेकांनी धमकी दिली पण वरळीतून मी एकटाच गेलो होतो; शिंदेंनी सांगितली आठवण

संतोष कानडे

मुंबईः वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोळी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी भाजप आणि शिंदे गटातल्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी शक्तिप्रदर्शन केल्याने राज्याच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागून राहिल्या होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले की, कोळी समाज हा जीवाला जीव देणारा आहे. समुद्रांच्या लाटांशी सामना करणारा कोळी समाज हा इथला मूळनिवासी आहे. मी कोळी नसलो तरी या व्यवसायाशी माझं जवळचं नातं आहे. मी मासेविक्रीचा व्यवसाय पूर्वी केलेला आहे.

शिंदे पुढे म्हणाले की, जेव्हा देशाचे पंतप्रधान मुंबईत आले तेव्हा कोळी बंधू-भगिनींनी त्यांचं स्वागत केलं. मागे एकदा बराक ओबामा यांचंही कोळी बांधवांनी स्वागत केलं होतं. कोळी बांधवांची परंपरा आणि संस्कृती मोठी आहे, ते आपण जपलं पाहिजे.

कोळी बांधवांचा कोस्टल रोडला विरोध नव्हता. फक्त दोन पिलरमध्ये अंतर वाढवण्याची मागणी होती. पूर्वी ६० फूट अंतराने काम होणार होतं. परंतु बोटींना धोका निर्माण होऊ शकतो म्हणून हे अंतर १२० फूट ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला. मागच्या सरकरला सामान्यांच्या प्रश्नांचं देणंघेणं नव्हतं म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आमचं सरकार जनतेच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार, असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदे छोटी आव्हानं स्वीकारत नाही. थेट मोठीच आव्हानं स्वीकारतो. आम्ही गुवाहटीला असतांना काही लोक म्हणाले होते, वरळीतून जावून तर दाखवा.

'पण हा एकनाथ शिंदे वरळीतून गेला तोही रस्त्याने एकटाच. आम्हाला बाळासाहेबांनी निर्भिडतेची शिकवण दिली आहे' असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Santa Video : विराट कोहली नाताळादिवशी बनला सांताक्लॉज, मुलांना दिले भन्नाट गिफ्ट्स, व्हिडिओ व्हायरल

'धुरंधर'मधील २० वर्षीय अभिनेत्री आणि सचिन तेंडुलकर यांचा नेमका संबंध काय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

Uruli Kanchan Crime : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन २ गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Maoist Encounter : एक कोटींपेक्षा अधिकचा इनाम असलेला माओवादी लीडर गणेश उईकेसह सहा जण चकमकीत ठार!

Latest Marathi News Live Update : हिंदूंच्या घरांवर हल्ला करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना बांगलादेश पोलिसांनी बक्षीस जाहीर केले

SCROLL FOR NEXT