Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

OBC आरक्षण : निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय; विधानसभेत प्रस्ताव मंजूर

सकाळ डिजिटल टीम

हिवाळी अधिवेशनात ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत अशी शिफारस राज्य निवडणुक आयोगाला राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल. यासंदर्भात ठराव सभागृहात एकमताने मंजुर कऱण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव सभागृहात मांडला. भाजपने या ठरावाला मंजुरी दिली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत, आरक्षण मिळेपर्यंत त्या पुढे ढकलाव्यात असा ठराव विधानसभेत मंजुर करण्यात आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिनियमातील तरतुदीनुसार आरक्षणाची तरतूद २७ टक्क्यांची आहे, मात्र आरक्षणाशिवाय निवडणुका जाहीर झाल्या आङेत. त्यामुळे ओबीसी त्यांच्या हक्कांपासून वंचित राहतील. त्यांनाही प्रतिनिधीत्व मिळणं गरजेचं आहे. त्यांना वगळून निवडणूक घेण्यात येऊ नये अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने एकमताने करत असल्याचं अजित पवार सभागृहात म्हणाले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन दिलं. यानंतर राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात निवडणुका पुढे ढकलण्यासाठी शिफारस केली जाईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा झाली याआधी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (OBC reservation) जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT