Murji Patel Sakal
महाराष्ट्र बातम्या

Andheri By-election : अपक्ष निवडणूक लढवणार का? मुरजी पटेलांचं उत्तर

सकाळ डिजिटल टीम

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात मुरजी पटेल हे अपक्ष लढणार अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मुरजी पटले यांनी माध्यमांशी बोलताना अपक्ष लढण्यासंदर्भात स्पष्ट केलं आहे.(murji patel reaction after Announced Withdraw Candidate From Andheri East Bypoll )

बावनकुळे यांच्या घोषणेनंतर मुरजी पटेल यांनी माध्यामांशी संवाद साधला. पक्षाच्या आदेशाचं पालन करु असं स्पष्ट सांगितलं. तसेच, मी एकदम खूश आहे आणि पक्षाचा आदेश मानणार आहे. त्यावर तुम्ही अपक्ष निवडणूक लढवणार का? असं विचारल्यावर मुरजी पटेल यांनी अजिबात नाही... अजिबात नाही... असं म्हणत आपण पक्षाच्याच आदेशाचं पालन करणार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

मुरजी पटले यांनी पक्षाच्या निर्णयामुळे खूश असल्याची प्रतिक्रिया दिली असली तरी मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी अंधेरी तीव्र नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातच घोषणाबाजी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

पोटनिवडणुकीतून उमेदवार माघार घेण्याबाबत दादर येथील मुंबई कार्यालयामध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, अमित साटम, राजहंस सिंह, कृपाशंकर सिंह, चित्रा वाघ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

त्याआधी रविवारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे निवडणूक लढवण्यासाठी ठाम होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर आज भाजपकडून आज झालेल्या बैठकीत माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या पोटनिवडणुकीत विजयी होतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC : एमपीएससीच्या मुलाखती पुढे ढकलल्या; पात्र उमेदवारांवर मोठा अन्याय

Traffic Challan: कारमध्ये गाणं वाजवलं तर लागणार मोठा दंड, गाडी जप्तही होऊ शकते; काय आहे नियम?

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

Vishwa Shanti Yatra : आंतरिक शांतीतून विश्वशांती; अभूतपूर्व 'विश्व शांती यात्रा २०२६'चे आयोजन

Apple Layoffs: दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कपात; Fitness+ मधील ‘या’ टीमवरही आता गदा

SCROLL FOR NEXT