Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपचं 'ऑफर लेटर' रस्त्यावर पडलंय का?

बाळकृष्ण मधाळे

गोवा : मला भाजपातील (BJP) काही वरिष्ठ नेत्यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी पवार यके पवार म्हणत ती ऑफर धुडकावून लावली. मुश्रीफांच्या (Hasan Mushrif) या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चांगलाच समाचार घेतलाय. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल, जो एखादा व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसात निघाला असताना पोलिस त्याला अडवितात, त्याला घरात कोंडून ठेवतात. हे तर ठोकशाहीचच सरकार आहे. स्वतंत्र भारतात अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था पाहायला मिळाली नाही. हे खूपच भयानक असून आम्ही किरीट सोमय्यांच्या (BJP leader kirit somaiya) पाठिशी ठामपणे उभे आहोत, असे सांगत त्यांनी मुश्रीफांच्या भाजप प्रवेशाची खिल्ली उडवली.

मला भाजपातील काही वरिष्ठ नेत्यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी पवार यके पवार म्हणत ती ऑफर धुडकावून लावली.

आज भाजप नेते किरीट सोमय्यांनी कऱ्हाडात पत्रकार परिषद घेत मंत्री हसन मुश्रीफांचे घोटाळे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सडकून टीकाही त्यांनी केली. त्याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुश्रीफांवर निशाणा साधलाय. भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आज (सोमवार) गोव्यात आले आहेत. विमानतळावर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर, नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, फडणवीस यांनी किरीट सोमय्या यांच्यावरील कारवाई चुकीची असल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मला भाजपातील काही वरिष्ठ नेत्यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, मी पवार यके पवार म्हणत ती ऑफर धुडकावून लावली. मुश्रीफांच्या या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतलाय. यावर फडणवीसांनी मुश्रीफांना कोणी ऑफर दिली? असा प्रतिप्रश्न करत ऑफर लेटर घेऊन आम्ही थोडीच फिरत असतो का? आमचे ऑफर लेटेर कोठेही रस्त्यावर पडलेले नाही, असा सणसणीत टोला माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी मुश्रीफांना लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election Announce : जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता, आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

Gondia Crime: मुलगा गेला, नंतर सासऱ्याने सुनेच्या हत्येसाठी रचला कट! LICचे पैसे अन् जमीन हडपण्यासाठीचा काळा डाव उघड?

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'पिंगा गं पोरी पिंगा' मालिका; सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितला निर्णय; म्हणाली-

Latest Marathi News Live Update : अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिकाबाहेर राडा

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने का घालतात? जाणून घ्या या गोड परंपरेमागचं रहस्य

SCROLL FOR NEXT