ST-Bus sakal media
महाराष्ट्र बातम्या

कर्जतमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

नेरळ : कर्जत एसटी कामगारांनी (karjat ST bus workers) संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण (strike) सुरू केले होते. त्यामध्ये विविध कामगार संघटनांचे (workers union) बहुतांश एसटी कामगार यामध्ये सहभागी झाले होते; मात्र आता उपोषण स्थगित करून संयुक्त कृती समिती बरखास्त केली आणि संघटनांच्या पदाचे राजीनामे (resignation) देऊन प्रमुख मागणीसाठी (employee demands) कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केल्याने कर्जत आगारातून आज फक्त चार एसटी बस सुटल्या. त्यामुळे प्रवाशांची दुसऱ्या दिवशीही गैरसोय झाली. एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न (suicide attempt) केला; परंतु अन्य कामगारांनी वेळीच त्याला अडवल्याने अनर्थ टळला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण झाल्या; परंतु राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची प्रमुख मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आपल्या पदांचे राजीनामे विविध संघटनांकडे पाठवून बेमुदत संपाचे हत्यार उचलले. याप्रसंगी पंढरीनाथ काकडे या चालक कर्मचाऱ्याने शेजारीच असलेल्या झाडाला फास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला; परंतु तेथे उपस्थित अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला अडवल्याने पुढील अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Wedding Card : टीपू सुलतान प्रेरणास्थान, शिवरायांचाही उल्लेख; अमरावतीतील लग्नपत्रिका व्हायरल...

Anewadi Toll Traffic Jam : पुणे-बंगळुरू हायवेवर 5 किमीच्या रांगा! आनेवाडी टोलवर मुंबई–पुण्यातील चाकरमानी अडकले; सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर प्रचंड गर्दी

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! ३० तास पाणीपुरवठा ठप्प, 'या' सहा विभागातील जलवाहिनी बंद होणार; कधी? वाचा सविस्तर

आईकडून मिळणारी तात्पुरती प्रतिकारशक्ती संपण्यापूर्वी लसीकरण का आवश्यक असतं? जन्मानंतरच्या पहिल्या डोसबद्दल जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चंद्रपूर वीज केंद्रात पाचशे मेगावॉट वीजनिर्मिती ठप्प

SCROLL FOR NEXT