anil parab sakal media
महाराष्ट्र बातम्या

"संप मागे घेण्याबाबत कृती समितीने कामगारांना समजावून सांगावे"

परिवहन मंत्री अनिल परब यांचे आवाहन

प्रशांत कांबळे

मुंबई : एसटी महामंडळ (St bus corporation) राज्य सरकारमध्ये (mva Government) विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी (merge demand) पुकारण्यात आलेल्या संपामुळे (strike) महामंडळाचे व पर्यायाने कामगारांचे नुकसान होत आहे. कामगारांचे नुकसान होऊ नये, अशी माझी भावना आहे. कामगारांचे होणारे नुकसान हे कोणताही राजकीय पक्ष (political party) भरून देणार नाही. त्यामुळे कामगारांनी संप मागे घ्यावा व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही कामगारांना संप मागे घेण्याबाबत समजावून सांगावे, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब (Anil Parab) यांनी केले.

एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा संप बेकायदा ठरवत कामगारांना काम बंद आंदोलन मागे घेऊन कामावर परतण्याचे आदेश दिले होते. पण काही कामगार संघटना संपाच्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार महामंडळ प्रशासनाने निलंबनाची कारवाई हाती घेताच ही कारवाई मागे घेण्याबाबत कामगार संघटनांच्या महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

त्यावेळी अॅड. परब यांनी कृती समितीला आवाहन केले. संपामुळे कामगारांचे नुकसान होत आहे. ते भावनेच्या भरात संपात सहभागी झाले असले तरी त्यांना माघारी बोलवा, अजूनही वेळ गेलेली नाही, असेही अॅड. परब म्हणाले. राज्यात 56 महामंडळे आहेत. उद्या ही महामंडळेही शासनात विलिनीकरणाची मागणी जोर धरू लागेल. एखादे महामंडळ विलिनीकरण करायचे झाले त्याचा सारासार विचार करावा लागतो. ही वस्तुस्थिती कामगारांना समजावून सांगा आणि त्यांना पुन्हा कामावर रूजू होण्यास सांगावे, असे आवाहनही अॅड. परब यांनी केले. दरम्यान, कुठल्याही कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने आकसाने कारवाई केलेली नाही, असेही अॅड. परब यांनी स्पष्ट केले.

सदाभाऊ खोत यांनीही घेतली भेट

एसटी महामंडळाच्या विलिनीकरणा संदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनीही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांची भेट घेतली. कामगारांचे पगार खूपच कमी आहेत. कर्मचार्‍यांच्या आत्महत्या होत आहेत, त्यामुळे महामंडळाचे तातडीने विलीनीकरण करा, अशी मागणी खोत यांनी केली. त्यावेळी अॅड. परब म्हणाले, कामगारांच्या आत्महत्या होणे दुर्दैवी आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे महामंडळ खूपच आर्थिक गर्तेत सापडले आहे. कामगारांच्या वेतनाचा विलंब होऊ नये यासाठी राज्य सरकारने निधी दिला. विलिनीकरणाबाबत न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्यानुसार प्रक्रिया होईल. सरकारने त्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो अहवाल येईल त्यावर सरकार निर्णय घेईल, असे सांगत कामगारांनी संप मागे घ्यावा. संप मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे, याकडेही अॅड. परब यांनी खोत व त्यांच्यासोबत आलेल्या कामगारांचे लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT