Nawab Malik E Sakal
महाराष्ट्र बातम्या

स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे स्वबळ

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘एक चलो रे’ ची हाक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : काँग्रेस (Congress) स्वबळावरून चार पावले पुढे गेल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘एक चलो रे’ची हाक दिली आहे. राज्यातील आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याची घटक पक्षांची तयारी नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे प्रवक्ते नवाब मालिक (Nawab Malik) यांनीही स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. परंतु, त्या-त्या जिल्ह्यांतील नेते निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. (mva parties not ready fight cooperative election say nawab malik)

राज्यातील १५ महापालिकांसह २७ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि विरोधीपक्ष भाजपनेही तयारी चालविली आहे. मात्र, भाजपचे वर्चस्व कमी करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढविणार असल्याची चर्चा होती.

मात्र, पक्ष वाढविण्याचा विचाराने या निवडणुकांत स्वबळ अजमाविण्याचा काँग्रेसचा निर्णय झाला असून, त्यादृष्टीने पक्षाने तयारीही केली आहे. त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी मांडत, काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाला कानपिचक्याही दिल्या होत्या. त्यानंतरही काँग्रेसने स्वबळाचा आपला अजेंडा रेटण्याची भूमिका कायम ठेवल्यानंतर राष्ट्रवादीनेही आघाडी न करताना स्वतःच्या बळावर लढण्याची भूमिका घेतली आहे.

‘भाजपची ताकद पाहून निवडणुका लढविल्या जातील. सर्वच भागांत भाजपविरोधात महाविकास आघाडी असेल, असे नाही,’ हेही मलिक यांनी सांगितले. मलिक म्हणाले, ‘ज्या भागांत भाजपचे वर्चस्व नाही. त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे घटकपक्ष स्वतंत्रपणे लढतील. जिथे भाजपची ताकद आहे; तिथे मात्र, दोन किंवा तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढतील. त्यामुळे भाजपची पिछेहाट होईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT