MVA Press Conference Uddhav Thackeray Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: पंतप्रधानांनी विधानसभेसाठी अजून सभा घ्याव्यात... शरद पवारांनी का मानले मोदींचे आभार ?

Narendra Modi: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आज महाविकास आघाडीची (MVA) पहिली बैठक पार पडली. मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक झाली. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी-एससीपी आणि शिवसेना (यूबीटी)चे प्रमुख नेते सहभागी झाले होते.

बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाे, "या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदींच्या जेवढ्या जास्त सभा झाल्या तिथं आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. विधानसभेला त्यांनी अजून सभा घेतल्या तर त्या आमच्या फायद्याच्या ठरतील."

पुढे बोलताना पवार म्हणाले, "देशाचे पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १८ सभा आणि एक रोड शो घेतला त्या सर्व ठिकाणी आमच्या उमेदवारला फायदा झाला. विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या जेवढ्या जास्त सभा होतील तेवढा आम्हाला फायदा होईल."

आज महाविकास आघाडीच्या बैठकीत एकत्र विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर बैठकी भाजला रोखण्यासाठी विविध सामाजिक संघटना, सोशल मीडिया आणि युट्यूबवर अनेकांनी प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांचे आभारही मानण्यात आले

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या, तर भाजप आघाडीला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीतील या यशामुळे महाविकास आघाडीला प्रोत्साहन मिळाले असून, या आघाडीने पुन्हा एकदा एकत्र विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होऊ शकतात. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. सध्या राज्यात शिवसेना शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेतृत्वाखाली सरकार आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची विधानसभा निवडणुकीतही एमव्हीएला पुनरावृत्ती करायची आहे. त्यामुळे आज त्यांनी बैठक आयोजीत केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mango Market Rate : फळांचा राजा हापूस आंबा मार्केटमध्ये दाखल; प्रतिडझनाचा दर किती?

Mumbai BEST Bus: महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टचा मोठा निर्णय, 'या' मार्गांवर विशेष बस चालणार!

Marathi Breaking News LIVE: छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरात हिट अँड रन

Putin India Visit: आजचा भारत ७७ वर्षांपूर्वीचा नाही, मोदी-पुतिन भेटीत उघडकीस आले राजकारण अन् तेल करारांचे रहस्य; बाह्य दबाव फेल!

तेजश्री प्रधानचा गौरव! महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठीत सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, म्हणाली...'प्रत्येक दिवस काहीतरी नवीन...'

SCROLL FOR NEXT