Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

MVA Rally : ...तेव्हा काय यांची दातखिळी बसली होती का? अजित पवार मराठवाड्यात कडाडले

रवींद्र देशमुख

छत्रपती संभाजीनगर - माहाविकास आघाडीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तिन्ही पक्षांनी मिळून ही सभा आयोजित केल्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

अजित पवार म्हणाले की, सरकार चांगल्या पद्धतीने काम करत होतं. मात्र एक गट बाजुला गेला. पक्षांतर बंदी कायदा असताना देखील ते बाहेर गेले. त्यात निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष चिन्ह आणि नाव दिलं. निवडणूक आयोग असं करत असेल तर काय करावं, असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो.

दरम्यान निवडणूक आय़ोगाने निकाल दिला असला तरी मला आणि तुम्हा सर्वांना आता सर्वोच्च न्यायालयाकडून आशा असल्याचं अजित पवार म्हणाले. ते पुढं म्हणाले की, मागील काळात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. कर्मवीर भाऊराव पाटील-भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला. तेव्हा यांच्या सरकारमधील नेत्यांची दातखिळी बसली होती का, असा संतप्त सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

सध्या सरकारकडून सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात गौरव यात्रा काढण्यात आली. मात्र आमच्या महापुरषांचा अवमान केला तेव्हा हे गप्प बसल्याचं अजित पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT