Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: ‘मविआ’चे जागावाटप निश्चित? ठाकरे गट लोकसभेच्या २० जागा लढविण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीचे जागावाटप ३१ डिसेंबरच्या आत करावे, असा निर्णय ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत झाला असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे.

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे जागावाटप ३१ डिसेंबरच्या आत करावे, असा निर्णय ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत झाला असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र परिवर्तनाला सज्ज असून, आमचे सगळे ठरले आहे असे सांगितले. काँग्रेसने जागावाटप सामोपचाराने होईल, अशी ग्वाही दिली आहे. तर, ‘जिंकेल त्याला उमेदवारी’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितलेले सूत्र आहे.

जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात निश्चित आकडे अद्याप स्पष्ट केले जात नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाने २० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षाने तशी तयारीही सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या जागांपेक्षा एकाही जागेचा आग्रह सोडणे अयोग्य होते. मात्र, ‘इंडिया’ आघाडीचा मार्ग सुकर होण्यासाठी शिवसेना त्याग करण्याचे मान्य करत आकड्यांवर विचार करण्यास तयार असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले.

काँग्रेस निरीक्षकपदासाठी चेन्निथला आघाडीवर

महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी सुधारायची गरज असल्याचे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मत आहे. त्यासाठी त्यांना निरीक्षकपदी नवा नेता नेमायचा आहे. यामध्ये रमेश चेन्निथला यांचे नाव आघाडीवर आहे. के. सी. वेणुगोपाल या राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्याने होकार दिल्यास ही घोषणा लगेच केली जाईल, असे समजते.

वाद होणार नाहीत : चव्हाण

काँग्रेसला गेल्या निवडणुकीत जेमतेम एक जागा जिंकता आली होती. चंद्रपुरात अनपेक्षित विजय मिळविणाऱ्या सुरेश (बाळू) धानोरकर यांचे खासदार असतानाच निधन झाले. त्यामुळे आज काँग्रेसचा एकही खासदार नाही. त्यांना ज्या जागा मिळतील, तो बोनस असल्याचे बोलले जाते. काँग्रेसने हा आकडा अमान्य करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे. आम्ही एकसंध आहोत.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर फरक पडला आहे, असे पक्षाच्या दिल्लीकर नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सांगितले आहे. परिस्थिती लक्षात घेत नव्याने जागावाटप होईल, असे काँग्रेसचे ठाम मत आहे. मात्र, भाजपला महाराष्ट्रात रोखणे आवश्यक असल्याने कोणताही वाद होणार नाही. महाविकास आघाडी एकसंधपणे निवडणूक लढवेल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT