N D Patil Demise e sakal
महाराष्ट्र बातम्या

मंत्री असूनही स्वतःच धुवायचे कपडे, स्वावलंबी एन. डी. पाटलांचा किस्सा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील (N D Patil Demised) यांचे आज निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयोमानामुळे उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याने आज त्यांची प्राणज्योत मालवली. एन. डी. पाटील महाराष्ट्राचे सहकारमंत्री (Maharashtra Ex Minister N D Patil) होते तेव्हा त्यांच्याबद्दलचा एक किस्सा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितला होता.

एन. डी. पाटील महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते. त्यावेळी त्यांना एक व्यक्ती भेटायला गेली. त्यावेळी मंत्री पाटील यांच्या बंगल्यावरील सर्व कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे ती व्यक्ती कोणालाही न विचारता बंगल्यात गेली. संबंधित व्यक्ती बैठकीच्या खोलीत बराच वेळ बसली होती. बाहेर कोणी येत नव्हते. पण, कपडे धुण्याचा आवाज मात्र येत होता. त्यामुळे आवाजाच्या दिशेने ते तिकडे गेले. त्यावेळी चक्क तत्कालीन मंत्री एन. डी. पाटील हे कपडे धूत बसले होते. ती व्यक्ती हे दृश्य पाहून आश्चर्यचकीत झाली. कारण, राज्याचे सहकारमंत्री चक्क कपडे धूवत होते. पाटील यांना देखील कोणीतरी आल्याची चाहूल लागली. त्यावेळी त्यांनी दचकून मागे वळून बघितलं आणि म्हणाले, ''तुम्ही आलाय का? थांब मी आलोच. सुट्टी होती म्हणून कपडे धूत होतो.'' त्यांच्या तोंडून हे वाक्य ऐकून त्या व्यक्तीला देखील आश्चर्य वाटलं. त्यांच्याबद्दलचे असे अनेक प्रसंग आहेत. त्यांचे कार्यकर्तेच हे प्रसंग सांगत असतात.

एन. डी. पाटील यांचा जन्म हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एन. डी. पाटील यांचं गाव होतं. बालपणातच सत्यशोधक विचार ऐकले आणि त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट झाली. त्यानंतर ते रयत शिक्षण संस्थेशी जुळले. तिथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पण, त्यांनी नोकरी सोडली आणि शेतकरी कामगार पक्षासाठी पूर्ण दिला. त्यांना पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम केलं. याच पक्षातून ते विधान परिषदेवर निवडून गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT